
अजूनही कानात माझ्या deshbhakti geet
अजूनही कानात माझ्या… deshbhakti geet
अजूनही कानात माझ्या गुंजताहेत वंदे मातरमचे नारे
हसत हसत अन् चढत होते फासावरती सारे
त्यागला होता संसार
देशच होता प्राण
त्यागले होते तारुण्य
मिळविण्या स्वातंत्र्य
अजूनही आठवताहेत मला ते रस्ते
सांडले होते त्यांच्यावर रक्तच रक्त नुसते
पडले होते देहही
पडले होते इरादे
मात्र आवाज होता कानी
विसरू नका रे वादे
अजूनही आठवताहेत मला ते डोळे
ओकत होते फक्त आगीचे गोळे
हृदय नव्हतेच ते
झाले होते दगड
पाहत होते वाट
तुडविण्या फिरंगी रग्गड
आज तेच आहेत रस्ते, तेच आहेत डोळे
वाट बघताहेत अजून एका उठावाची
मग लागतील तसेच नारे
पुन्हा उठतील पेटूनी सारे
हाती घेउनी मशाली
लढण्या अमानवतेविरुद्ध!!!
-शिवसुत

माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

दिनांक २६ जानेवरी २०१० साली लिहिली होती.
या २६ जानेवारीच्या औचित्यावर पोस्ट करावी म्हणून टाकत आहे.