
ती आणि ती A lady and a prostitute
ती आणि ती A lady and a prostitute
स्वारगेटजवळील कॅफे आयडियल मध्ये ती तिची वाट पाहत बसली होती. संध्याकाळचे चार वाजत आले होते. ती सतत आपल्या हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होती. वेळ पाहत असेल बहुतेक. cafe near swargate, A lady and a prostitute
नवरा ऑफिसातून घरी यायच्या आधी तिला मोगराला भेटून जायचं होतं. पहिल्यांदाच भेटणार होती ती तिला. तसंही अशा बायकांना ती उभ्या आयुष्यात कधी भेटली नव्हतीच. कशी भेटेल? कधी संबंध यायचं कारणच काय? त्यातही ती मोगरा काही तयारच नव्हती भेटायला; पण तिला तिने कसेबसे मनवले होते.
If you like the story- A lady and a prostitute, don’t forget to share it with your friends.

“अजून कशी येईना ही?” असे म्हणत तिने एकदा आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली आणि बाहेर नजर रोखून ती तिच्या येण्याकडे डोळे लावून बसली. बाहेर एकामागून एक भराभर अशी वाहने निघून जात होती. दुचाकी, चारचाकी, रिक्षा, पीएमट्या. कान नुसते वाजवून सोडीत होती.
साधारण मागच्या आठवड्यात तिचं मोगराशी बोलणं झालेलं. तेही पहिल्यांदाच.
“हॅ. . हॅ. . लो. हॅलो? मो. . मोगरा?” सुचेताने जरा संकोचानेच विचारले. एका वेश्येला नेमकं कसं बोलावं हाच विचार बहुधा ती मनात करीत असावी; पण वेश्या असली तर ती काय माणूस नाही? तरीही काहीसा संकोच असतोच की!
“मोगरा हीच बोल रेली मैं. अब आगे भी बोल.” मोगरा पलीकडून घाईत बोलताना वाटली. बहुधा तिने तोंडात पानाचा विडा धरला असावा असा तिचा सुर होता.
सुचेताला तिला नेमकं कसं बोलावं काही सुचेना. ती आपला खालचा ओठ दातांत घट्ट पकडून बोलण्याचा प्रयत्न करीत होती खरी; पण शब्द फुटले तर नशीब!
पलीकडून कोणीच काही बोलत नाही म्हणून मग मोगराने फोन ठेवून दिला. सुचेताने आपले डोळे घट्ट मिटत आणि ओठ तसाच दाबत एक दीर्घ श्वास घेतला. काही क्षण विचार करून मग तिने पुन्हा मोगराला फोन लावला. आज तिला बोलायचेच असा मनाशी पक्का निर्धार केला होता आता तिने.
“मोगरा?” तिने विचारले.
“नहीं, अब चमेली बोल रेली मैं.” तिने वैतागून उत्तर दिले. तिच्या त्या उत्तरावर सुचेता पुन्हा गप्प झाली. तिची ती चुप्पी तोडीत मोगरा मग मोठ्यानेच बोलली, “अब बोलेगी भी? मोगरा हीच हैं मैं. धंदे का वखत होने को हैं. खाली टाईमपास मत कर. वरना रख देती मैं. क्या?”
“म्. . मी, मी सुचेता. सुचेता बोलतेय.” ती धीर करून म्हणाली एकदाची.
“देख सुचेता, ये औरत लोगों का आपण को जमता नहीं हैं. तू किसी और को कॉल लगा. रखती मैं.”
“अहो, अहो मोगरा. . मोगरा ताई. प्लीज नका. . नका ठेवू फोन. माझं तुमच्याकडेच काम आहे.” तिने आधीच्या सारखा आपला फोन ठेवून देऊ नये म्हणून ती विनवणी करू लागली. मोगरा काही न बोलता तशीच फोन कानाशी धरून उभी राहिली.
आजपर्यंत तिला लोकांनी खूप नावांनी बोलावले होते. धंदेवाली, रंडी, छिनाल, रांड अशा कैक नावांनी; पण ताई? आज कुणीतरी तिला ताई म्हणून बोलावले होते. आणि क्षणात त्या वेश्येआड दडलेली तिच्यातली ती स्त्री जागी झाली होती.
“नाय ठेवत फोन. बोल तू सुचेता.” वरून खरबडीत वाटणाऱ्या फणसाच्या आतून रसाळ गोड असे गरे बाहेर पडावे तसे मोगराच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले. नकळतच अगदी!

“मला. . ते.” म्हणता म्हणता सुचेता पुन्हा गप्प झाली. तिला कसे विचारावे तिला कळेना. आजपर्यंत तिने ज्या काही वेश्या पाहिल्या होत्या त्या चित्रपटातच. त्यातून तिचा समजच झाला होता की वेश्या म्हणजे स्वभावाने फटकळ, वाट्टेल तसे बोलणाऱ्या, मनाला वाटेल तशी उत्तरे देणाऱ्या, शिव्या घालणाऱ्या आणि सोबतच अतृप्त पुरुषी देहाची भूक शमविणाऱ्या!
“आगं माझी आय. धंद्याचा टाईम हाय. बोल की पटापटा. मुकादम शिव्या घालंल मला.” ती म्हणाली.
“मला भेटायचंय तुम्हाला.” ती झटदिशी म्हणाली व गप्प झाली.
“अगं मी तुला आत्ताच बोलली की. आपल्याला नाय जमत बायकांचं; पण आता तू बोलती तर..”
“अहो ताई, तसलं काही नाही हो. माझं दुसरं काम आहे तुमच्याकडे.” मोगराचे बोलणे मध्येच थांबवत ती म्हणाली.
सुचेताने परत एकदा मोबाईलमध्ये पाहिले. साडेचार वाजलेले. आता आपसूकच तिची बोटे ती बसलेल्या टेबलाशी नी हातातल्या मोबाईलशी चाळा करू लागली. तिला निघायला उशीर होईल याची भीती होती मनात.
“मॅडम, काय घेणार?” इतका वेळ बसूनपण तिने काहीच न ऑर्डर केल्याने आतून एकाने तिला विचारले. cafe ideal menu, cafe near me
“पाचच मिनिट.” हाताने इशारा करीत ती एवढंच म्हणाली आणि पुन्हा ती बाहेर नजर रोखून पाहू लागली.
काही घटका टळून गेल्या असता एक भडक गुलाबी रंगाची सलवार कुर्ती घातलेली बाई आत आली. सुचेताचा कानोसा घेणाऱ्या नजरेने ती इतरत्र कटाक्ष टाकू लागली; पण तिची नजर पडली एका वेश्येची. तिच्यापेक्षा तेथील लोकांच्याच नजरा तिच्यावर आपोआप रोखल्या गेल्या. आणि त्यात भरीस भर म्हणून की काय तिने आपले ते यौवन तसेच उघडे सोडून दिले होते. त्यावर ना कसली ओढणी ना आणखी काही!
अंगाशी घट्ट चिकटलेल्या तिच्या त्या कपड्यांतून तिचे ते यौवनूभार प्रथमदर्शनी कुणाच्याही नजरेस पडणारे होते. सुचेताच्याही पडले. सोबतच तिच्या नजरेस पडले ते तिचे ते गोरेपान रूप, मस्तकावर बारीक पण नजरेस पडेल अशी हिरवी बिंदी, नाकात हलकाच चमकणारा छोटासा खडा आणि ओठांवर भडक लाल रंगाची लिपस्टिक!
“क्यू रे, पहले कभी औरत देखी नहीं क्या?” हातात कॉफीचा best cafe in pune मग पकडून विस्फारलेल्या डोळ्यांनी तिला पाहत असलेल्या आणि आपल्या मैत्रिणीसमोर बसलेल्या एका कॉलेजात जाणाऱ्या मुलाला तिने विचारले. तसे त्याने आपली नजर तिच्यावरून हटवली आणि स्ट्रॉने भराभर तो कॉफी ओढू लागला.

हीच मोगरा असावी अशी मनाशी खात्री करून मग सुचेता आपल्या खुर्चीतून उठली. मोगरा आपली मागे सोडलेली अगदी खाली नितंबापर्यंत रुळणारी वेणी झटक्यासरशी पुढे करीत तिच्याजवळ आली देखील. वेणीला दिलेल्या त्या झटक्याने वेणीशी असलेल्या त्या मोगऱ्याच्या फुलांच्या गजऱ्याचा सुगंध भोवताली दरवळला.
कॉफीने अर्धे भरलेले मग दोघींच्या पुढ्यात होते. दोघीही अधूनमधून स्ट्रॉने त्यातील कॉफीचे फुरके ओढीत होत्या. बोलत मात्र काहीच नव्हत्या.
“खाली कॉफीच पिलाने बुलाया हैं क्या?” मोगराने चुप्पी तोडीत तिला विचारले. तिच्या त्या बोलण्याने सुचेताची विचारांची तंद्री तुटली आणि तिने नुसतीच नकारार्थी मान हलवली.
“फिर?”
सुचेता काहीच बोलली नाही. आपल्याला तिला जे विचारायचे आहे ते नेमके कसे विचारावे याचाच ती जणू विचार करीत होती. काही क्षणाच्या त्या शांततेनंतर सुचेताने मनाशी पक्का निर्धार केला आणि तिच्या तोंडून फार मृदु आवाजात शब्द बाहेर पडले.
“आमचे हे येतात तुमच्याकडे. नका ना नादी लावू त्यांना, प्लीज? छोटी मुलगी आहे हो आम्हांला.” बोलता बोलता आता तिच्या डोळ्यांत अश्रू दाटले होते.
“देख सुचेता, आम्ही कुणाला नादी बिदी लावत न्हाय. मरद लोग खुद चलके आते हमारे पास. प्यास बुझाने के वास्ते. बहुत इमानदारी से धंदा करते हम लोग. अब तुम्हारा पती हीच बेवफा हैं तो मैं क्या करूँ?” मोगरा काहीशी चढया आवाजातच बोलून गेली. कदाचित तिला तिने नादी लावू नका म्हटल्याचा राग आला असावा. परंतु तिच्या त्या बोलण्याने आतील लोक त्या दोघींकडे तिरक्या नजरेने पाहू लागले होते. सुचेताला तर आता खूप अवघडल्यासारखे झाले होते.
मग मोगरा पुन्हा सुचेताला बोलू लागली, हळू आवाजात, “अगं आम्हाला कुणा एकाला नादी लावून नाय करता येत गं धंदा. लई मर्द लोक घ्यावे लागतात; पण कुणाशी मन, मन नाही जुळवता येत.”
आसवांनी भरलेल्या नजरेने सुचेता कॉफीच्या मगाला न्याहाळीत होती. ती फक्त तिला विनवणी करू शकत होती. बाकी ती करणार तरी काय होती. आपलंच नाणं खोटं असं मनाशी म्हणून ती आपल्या नशिबाला दूषणे देत असावी बहुतेक!
“क्या नाम हैं तेरे मरद का?” मोगराने असे विचारताच तिने काहीशा शरमेनेच इकडे तिकडे पाहिले आणि हळूच आपला मोबाईल तिच्याकडे सरकवत तिला त्या दोघांचे तसल्या अवस्थेतील फोटो दाखवले.
एखाद्याच्या बायकोने आपल्या नवऱ्याचे आणि परस्त्रीचे अगदी तसल्या अवस्थेतील फोटो दाखवण्याची तिची ही पहिलीच वेळ होती. मोगराला काहीसे ओशाळल्यासारखे झाले खरे; पण त्यात तिची तर काय चुकी?
चुकी तर सुचेताचीही तरी काय होती? वाममार्गाला लागलेल्या आपल्या पतीला ती सरळमार्गाला आणू पाहत होती. त्यासाठी आज ती इथवर आली होती.
“नका ना येऊ देऊ त्यांना. मी हात जोडते.” काही काळाची दोघींच्यातली ती शांतता भंग करीत हात जोडीतच सुचेता तिला म्हणाली.
“अगं पण.”
“माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल हो.” अशी ती म्हणताच ती आपल्या भूतकाळात गेली. कधीकाळी आपणही मुलगी होतो. आणि आज आपलं आयुष्य कसं उद्ध्वस्त झालंय या विचाराने तिला बोलण्यापासून रोखून धरले. तिला आता तिथे बसवत नव्हते. ती जगची उठली आणि जाता जाता सुचेताला म्हणाली, “मैं मना करूँगी तो किसी और के पास जाएगा मरद तेरा. किस किसको बोलेगी तू? त्यापेक्षा तूच कर कायतरी. ते काय म्हणतात की, साप भी मर जाय अन् काठी पण नाय तुटली पायजे.”
तिच्या त्या बोलण्यावर सुचेताने सकारात्मक मान हलवली; पण अजून काही विचारायच्या उद्देशाने ती तिला म्हणाली, “कशाला करतेस अगं? काहीतरी शिक्षण घेऊन एखादी नोकरी करायची ना! कुणीतरी हक्काचं माणूस आपलंही असावं असं नाही का गं वाटत?”
“पढाई के वास्ते हीच मामा लाया था पुणे और देख कहा छोड गया. आता हीच जिंदगी हाय बघ.” ती निर्विकार चेहऱ्याने तिला म्हणाली. सुचेताच्या डोळ्यांत तिच्यासाठी अश्रू तराळले; पण ती तरी काय करू शकणार होती म्हणा. तिच्यासारख्या अशा असंख्य मोगरा आपला बगीचा सोडून या काटेरी कुंपणात अडकून पडल्या होत्या. कायमच्याच!
“पुन्हा कधी भेटशील?” सुचेताने तिला विचारले. ती म्हणाली, “ कधीच नाही.” आणि थांबली व पुढे म्हणाली, “चांगल्या घरच्या बायकांनी आम्हाला भेटणं तुम्हाला शोभा नाय देणार. लोकांत बेअब्रू होईल की.”
ती जाता जाता मागे वळाली आणि काहीशी हसून म्हणाली, “तू ताई म्हणालीस एवढंच लई झालं बघ. अब चलती हूँ वरना रिशतों में उलझ जाऊँगी. धंदे का वखत हैं.”
ती निघून गेली पण. सुचेता मात्र तिच्या त्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत उभी राहिली. मनात स्वतःशीच बोलत होती ती- “चांगल्या घरच्या बायकांनी आम्हाला भेटणं तुम्हाला शोभा नाय देणार. लोकांत बेअब्रू होईल की.” men will be men
“आणि पुरुषांनी?” ती स्वतःशीच पुटपुटली आता.
[समाप्त]
माझ्या येणाऱ्या कथा कवितांचे अपडेट्स आपोआप मिळवण्यासाठी माझ्या वेबसाईटवर आल्यावर जे पॉप अप नोटिफिकेशन येते त्याला allow करा म्हणजे मी काही पोस्ट केल्यास आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येईल. माहितीसाठी खाली फोटो देत आहे.

marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,
best stories to read,best novels to read,best romance novels of all time,content writing,story writing, copy writing,storytelling,art of storytelling,
लेखणीसंग्रामच्या अजून कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
वॉशिंग्टन आणि अमेरिका Washington America भाग १
आपली व्हायरस ही कथा पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १
chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral
[…] ती आणि ती A lady and a prostitute […]
[…] ती आणि ती A lady and a prostitute […]
[…] ती आणि ती A lady and a prostitute […]