• Pune, Maharashtra
कथा
पावसात भिजलेली एक परीराणी

पावसात भिजलेली एक परीराणी

Spread the love

पावसात भिजलेली एक परीराणी

पाऊस! धो धो बरसत होता आज तो. यावेळी वळीवानेही तसा दगाच दिला होता आणि आता मृग त्याची जणू कमतरताच भरून काढत होता. प्रियकर आपल्या प्रेयसीला खूप अवधीनंतर भेटल्यावर जसा तिच्यावर अगणित चुंबनांचा वर्षाव करून तिला सुखावून टाकतो तसा तो आज धरतीला सुखावत होता.

कोथरूड डेपोच्या बाहेरचा तो बसस्टॉप (a bus stop) त्या भल्यामोठ्या पावसात जरा अस्पष्टच दिसत होता. मागून पडणाऱ्या लाईटच्या खांबाच्या उजेडात त्या पाऊसधारा जणू मोत्यांच्या प्रचंड वर्षावागत भासत होत्या.

रात्रीचे अकरा वाजत आले होते आणि आदिती अजूनही त्या रिकाम्या बसस्टॉपवर (kothrud bus depot) पीएमटीची (pmt) वाट पाहत उभी होती. अंगावर पिस्ता कलरचा कुर्ता, कमरेला निळी जीन्स (blue jeans), काखेत एक पर्स (best ladies purses in cheap)सारखी वाटणारी मात्र पर्स नसलेली अशी काहीशी मोठी बॅग घेऊन ती थोडी अवघडल्यागत तिथे उभी होती. बसस्टॉपचे छत पुरते उडाले असल्याकारणाने पडणारा पाऊस तिला यथेच्छ भिजवत होताच!

a girl in the rain
a girl in the rain

ती भिजली होती. कुडकुडत होती. ओठ थरथरत होते तिचे. भुकेने पोटात कावळे ओरडत होते तिच्या. पावसाने असेल कदाचित पण तिच्या डोळ्यांत पाणीही होते. कदाचित एकटेपणामुळे तिला रडूही आले असेल!

स्वारगेटला पोहचून तिला आता सातारा गाठायचे होते आणि डेपोतून काही पीएमटी बाहेर यायला तयार नव्हती.

तिच्या मोबाईलची रिंग (mobile ringing)वाजली. तिने दोन क्षण त्याच्या स्क्रीनकडे (mobile screen) पाहून फोन उचलला आणि तो कानाला लावला. भिजलेल्या तिच्या केसांतून पावसाचे टपोरे थेंब तिच्या अंगावरून खाली नितळत होते. भिजलेला तो कुर्ता तिच्या अंगाशी अगदी घट्ट चिकटला होता

“काय गं, जोराचा पडतोय का?” पलीकडून आवाज आला.

“हो मावशी. अगं खूपच जोराचा पडतोय आणि केव्हाचा पडतोय तो. पुरती ओलीचिंब झालीय मी.” आदिती वैतागून बोलत होती.

“तरी मी तुला निघताना छत्री घे म्हणत होते. पुण्याच्या पावसाचा (rain in pune) काय भरोसा? ते काय सातारा थोडीच आहे.”

“मला तर काहीच सुचत नाहीये मावशी. त्यात पीएमटीचा पत्ता नाही. कधी स्वारगेटला पोहचणार आणि कधी सातारा. देव जाणे.” ती रडवलेल्या आवाजात आजूबाजूला पाहत म्हणाली. कुणीतरी एक दारुडा बसस्टॉपवर येऊन तिला अगदी खालून वर निरखून पाहत उभा होता. जणू काही त्याच्या तोंडातली लाळ त्याच्या नजरेतूनच टपकत होती.

त्याला पाहून ती काहीशी घाबरली. फोनवर पलीकडून  मावशी काय बोलत होती तिकडे तिचं दुर्लक्ष झालं. अशा अनोळखी शहरात, भर पावसात एक मुलगी एकटीच त्या गळक्या बसस्टॉपवर उभी होती. बाजूचा तो दारुडा ज्याला ती एक संधी वाटत होती. भरपावसात त्या रस्त्यावरून कुणी जाताना दिसत नव्हतं. एखाददुसरं वाहन तेही पावसाच्या धारा कापत आणि आपल्या टायरांचा चर्रर्र आवाज करत सर्रर्रकन निघून जात होतं. हाक तरी कुणाला मारायची आणि मदत तरी कुणाला मागायची असल्या परिस्थितीत, या विचाराने ती अस्वस्थ झाली.  

“हॅलोss. हॅलो अगं आदिती? काय म्हणतेय मी? हॅलो? तुला आवाज येतोय का माझा? आदिती?” मावशी पलीकडून  बोलत होती.

“अं? क्.. काय मावशी?” ती थाळ्यावर येत म्हणाली.

“अगं मी म्हणतेय बस नाही मिळाली तर मोऱ्यांच्या इथे जा आज मुक्कामाला. मी त्यांना फोन करून सांगून ठेवते. तुला आवाज येतोय ना माझा? आदिती?”

पावसाच्या आवाजात ती मावशीच्या सूचनेचा अर्थ लावत होती. मोरे, मुक्काम एवढे काय ते शब्द तिच्या कानावर पडले होते खरे!

“तू काय म्हणतेय मला काहीच कळत नाहीये अगं मावशी. मी तुला बसमध्ये बसल्यावर कॉल करते.”

“अगं थांब आदिती.”

“आता आणि काय मावशी?”

काहीवेळ पलीकडून ती काहीच बोलली नाही. पावसाचा आवाज, मधूनच वीजांचा कडकडाट, समोरच्या रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, बसस्टॉपच्या त्या गळक्या छताचा आवाज, हे सगळे आवाज आता थोडे मागच्या अंगाला गेले आणि मावशीचा आवाज आला, “भेटला का गं तो?”

आदितीला काय उत्तर द्यावे समजेना. मावशीला काय सांगावं या विचारात ती शांतच राहिली.

“आदिती?”

“मी.. मी बस मिळाल्यावर कॉल करते मावशी. ठेवते आता.” असे म्हणून आदितीने कॉल कट करून मोबाईल काखेतील त्या बॅगेच्या एका कप्प्यात ठेवून दिला. डोळ्यांतील आसवे पावसाच्या पाण्यात मिसळून गालावरून खाली ओघळत होती. मघापासून दाबून ठेवलेले रडू तिने हुंदक्यासरशी बाहेर काढले. ती रडली. मग थांबली. पुन्हा रडली. पुन्हा थांबली.

अचानक तिला तो दारुडा माणूस आपल्या अगदी मागेच उभा असल्याची तिला जाणीव झाली. आधीच पावसात भिजलेली, त्यात रडलेली आणि आता तसल्या प्रसंगाने तिच्या अंगावर भीतीचा काटाच उभा राहिला, श्वासोच्छवास वाढला. भीतीची एक सणसणीत; पण थंडगार लहर तिच्या छातीतून पोटात आणि नंतर पायांत गेली. पुन्हा रडू आलं.

भेदरलेल्या अवस्थेतच तिने आपल्या डाव्या डोळ्याच्या कोपऱ्यातून आपल्या खांद्यावरून मागे हलकेच एक कटाक्ष टाकला. कुणीतरी अगदी तिला खेटून उभा असल्याची तिला खात्री झाली. ओठ थरथरले तिचे. तोंडाला जणू कोरड पडल्यासारखं झालं. बऱ्याच मुश्किलीने आपलं रडू आवरलं तिने. आता जे होईल ते पाहून घेऊ हा विचार मनाशी पक्का केला.

नजर समोर करताच साधारण एक तिशीतला एक तरुण त्या बसस्टॉपच्या अगदी समोर आपली गाडी उभी करून तिला पाहत उभा होता.  त्याला समोर पाहताच ती एकदम दचकली; पण भ्यायली नाही. का कुणास ठाऊक!

तिने मागे पुन्हा तसाच कटाक्ष टाकला तर तो दारुडा मागे बसस्टॉपच्या खांबाला जाऊन टेकून उभा राहिला होता. त्या तरुणाच्या येण्याने तो मागे हटला होता हे आदितीला समजलं.

“अख्खं कोथरूड (kothrud) पालथं घातलं आणि तू इथे आहेस?” तो तरुण म्हणाला.

“सॉरी?” आदिती शॉक बसल्यासारखी बोलली. हा कोण? याचा आणि आपला काय संबंध? असे बरेच प्रश्न तिला पडले होते.

“सॉरी वगैरे ते नंतर. आधी तू घरी चल. असं पावसात कुणी चिडून निघून जातं का घरातून?” तो बोलला. आता तिच्या भिजलेल्या कपाळावर प्रश्नांच्या आट्याच आट्या गोळा झाल्या होत्या. मात्र तिला त्याचा चेहरा कमालीचा आश्वासक नि विश्वासू वाटला.

“बस मग तशीच भिजत. पुन्हा मग सर्दी (having a cold) झाल्यावर मला बोलू नकोस. मागच्या वेळची सर्दी विसरलीस वाटतं. एकदा शिंका सुरू झाल्या की थांबणार नाहीत मग.” तो बोलतच होता आणि ती अजूनच गोंधळून चालली होती. तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ लक्षात घेऊन मग त्याने डोळ्यानेच इशारा करत तिला त्या दारुड्या माणसापासून धोका नसल्याचा दिलासा दिला. तिला मग कुठे हायसं वाटलं. ती म्हणाली, “प्रॉमिस कर पुढच्या वेळी तू भांडणार नाहीस म्हणून. नाहीतर मी इथेच थांबते.”

“प्रॉमिस.”

“भरोसा ठेवू?”

“अगदी डोळे झाकून.”

आदिती विचारात पडली. पाऊस कमी व्हायचं नाव घेत नव्हता. पीएमटीचा (pmt) काही पत्ता नव्हता. अंग भिजून कुडकुडत होती ती. त्यात तो तरुण तिला आपल्या घरी येण्यास सांगत होता आणि मागे तो दारुडा.. काय बरं वाईट असलं तर त्याच्या मनात? दारुडा आहे म्हणून तो वाईट म्हणायचं तर तो तरुण देखील कशावरून वाईट नसेल? तसंही एकाने आपल्याला फसवलं आहेच की आधी!

पाऊस सर्वांना भिजवतो. ओलंचिंब करतो; पण भिजणाऱ्या प्रत्येकाचा पाऊस मात्र सारखा अजिबातच नसतो. तिला तिचा नि त्याचा पाऊस सारखा वाटला असेल कदाचित. ती मनात कसलातरी विचार करत त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवर काहीच न बोलता येऊन बसली.

त्याची गाडी शास्त्री चौकातील मेट्रोच्या पोलला (pune metro) वळसा घालून उजवीकडे पोलिस स्टेशनच्या (police station) समोरून खाली उताराला गेली. तिथून एका ठिकाणाहून डावीकडे वळत मग ती एका अरुंद गल्लीत घुसली. पावसाचा जोर तसाच असल्याने रस्त्याला फक्त खळाळणारे पाणीच होते. बाकी काळं कुत्रंही दिसत नव्हतं.

बेडरूममधून (bedroom) आदिती आपले केस टॉवेलला (hair drier) पुसत बाहेर हॉलमध्ये आली. लाईट गेली असल्या कारणाने मोबाईलच्या उजेडात तो बाहेर बसला होता. तिने त्याची ट्रॅकपॅन्ट आणि त्याचाच टीशर्ट (trackpant and t shirt) अंगात घातला होता. त्याच्या ढगळ्या कपड्यांत ती काहीशी अवघडलेली वाटत होती. तरीही ओल्या केसांत ती कमालीची सुंदर दिसत होती. शिवाय मोबाईलवरच मागे बॅकग्राऊंडला (background) जुबिन नौटीयालचं (singer jubin nautiyal song) सुन सुन सुन बरसात की धुन (sun sun barsaat ki dhoon) हे गाणं बारीक आवाजात सुरू होतं.

तिचं ते अवघडलेपण ओळखून तो किंचितसा हसला. तेव्हा ती म्हणाली, “हसू नकोस अरे. एकतर या कपड्यांत मला कसंतरी होतंय आणि त्यात एका अनोळखी मुलासोबत असल्या पावसात..”

“या अनोळखी मुलाला किरण (kiran) म्हणतात.”

“अं?”

“किरण. माझं नाव.”

“ओह, आय गॉट इट.” ती म्हणाली आणि पुढे बोलती झाली, “आणि मी आदिती (aditi).”

“आदिती. अच्छा.” तो बोलला. आता पुढे काय बोलावे म्हणून तो गप्प बसला आणि तीही बोलायला काही नसल्यामुळे हाताच्या बोटांशी चाळे करत इकडे तिकडे पाहत उभी राहिली.

“अगं, तू उभी का? बसून घे ना?” किरण म्हणाला.

तिने कपडे चेंज (changing clothes) केले असले तरी तिच्या अंगातील थंडी अजून गेली नव्हती. ती आपले परस्पर दंड पकडून काहीशी संकोचाने तिथे उभी होती.

“आदिती?”

“अं? काय? काय म्हणालास?”

त्याने मग तिला हातानेच बसण्याचा इशारा केला आणि ती सावकाश सोप्यावर बसली. राहून राहून तिला एकच घोर लागला होता की आपण इथे आलोय खरे; पण काही बरावाईट प्रसंग घडला तर त्याला आपणच सर्वस्वी जबाबदार असू.

“घरी फोन करून कळवलंस का?” किरणने तिला विचारलं.

“बॅटरी डेड (battery dead) झालीय. पण तसंही मी काही रात्र काढणार नाही इथे. पाऊस बंद झाला की जाईन मी.”

“तू जाशील?”

“आय मीन तू ड्रॉप करशील मला? स्वारगेटला (swargate bus stand) ? करशील ना?”

त्यावर तो हसत म्हणाला, “ अगं, आधी पाऊस तर थांबू देत.”

“करशील ना ड्रॉप?”

“हो बाई हो.” 

“थॅंक्स.”

“पाऊस खूपच आहे ना?” किरणने विचारलं.

“तरी साताऱ्याच्या (satara maharashtra) खालीच.”

“मग तर तुला सवयच असेल असल्या पावसात भिजायची?” किरणच्या त्या प्रश्नावर ती गप्प झाली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले. ती म्हणाली, “आजपर्यंत माझ्यासाठी पावसात भिजले. आज मात्र कुणा दुसऱ्यासाठी भिजले.

“पण भिजत तर एकटीच होतीस.” तो म्हणाला आणि जोराची वीज कडाडली. तिच्या काळजात धस्स् झालं. डोळे पाणावले.

“की तो दूसरा तो दारुडा होता?” त्याने तिची चेष्टा करण्याच्या उद्देशाने विचारले. ती हसली; पण तिच्या त्या खोट्या हसण्यामागचे दु:ख त्याला दिसले आणि दिसले तिने थंडीने कुडकुडत आपलेच बाहु एकमेकांत गुंडाळलेले!

“अरे, मी तर तुला चहापाणी पण नाही विचारलं. आय एम सॉरी (i am sorry). मी लगेचच बनवतो.” तो म्हणाला.

“एकदा घड्याळात बघ किती वाजले आहेत ते. आणि बाय दी वे मला जोराची भूक लागली आहे. काही खाण्यासाठी असेल तर दे. चहापाणी राहू दे.”

त्याने मोबाईलमध्ये पाहिले तर बारा वाजायला आले होते. “अं.. खायला.. म्हटलं तर मॅगी आहे. चालेल?”

“चालेल काय पळेल.”

“मग मी लगेच बनवतो.”

“नाही नको.”

“अरे, आत्ता तर म्हणालीस ना जोराची भूक लागलीय म्हणून?”

“मला तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे तू नकोस बनवू मॅगी (nestle maggie). मी बनवेल.”

“छे छे. बिलकुलच नाही. तू बस इथे मी लगेच बनवून घेऊन येतो. तशी मलाही भूक लागलीच आहे.” असे म्हणून तो आपला मोबाईल बाहेर उजेडासाठी ठेवून तसाच आत किचनमध्ये गेला.

किचनमध्ये तो मॅगी बनवत असताना बाहेर आदिती त्याच्या हॉलमधील गोष्टी पाहत होती. त्याच्या कपाटातील पुस्तके, टेबल फ्रेम्स, वॉल फ्रेम्स (wall frames) ती हात बांधून अगदी निरखून पाहत होती. टेबलावरील एका फोटोफ्रेमने (photo frames) मात्र तिचे लक्ष वेधून घेतलं. ती बराच वेळ त्या फोटोफ्रेमला हातात घेऊन पाहत होती.

थोड्याच वेळात किरण आपल्या दोन्ही हातांत मॅगीचे दोन बाउल घेऊन बाहेर आला. ते खाली ठेवून तो पुन्हा आतमध्ये गेला आणि एक पेटती मेणबत्ती घेऊन बाहेर आला.

खाली फरशीवरच मांडी घालून दोघेजण मॅगीवर तुटून पडले. मधोमध तेवत असलेली ती मेणबत्तीची ज्योत एखादा इरॉटिक डान्स (erotic dance) करत असल्यागत भासत होती.

“थॅंक्स.” किरण तिला म्हणाला.

“थॅंक्स? कशाबद्दल?” आदितीने विचारलं.

“मॅगी छान झालीय म्हणून.” तो डोळा मारत तिला म्हणाला.

“ओह, आय एम सॉरी. बोलायचंच राहून गेलं. भूकच इतकी लागलीय ना. रियली सॉरी; पण खरंच खूप छान झालीय हं मॅगी.” ती त्याची स्तुती करत म्हणाली.

“बाय दी वे, एक विचारू?” तिने प्रश्न केला. त्याने फक्त होकारार्थी मान हलवली.

“लग्न झालंय तुझं?”

“अहं. का?”

“काही नाही. घर असं ठेवलंय की.. तुझी बायको..नाही म्हणजे त्या फोटोफ्रेममध्ये मग ती मुलगी.. आय मीन.. लिव इट.”

“ती माझी बायको नाहीये.”

“मला वाटलं की आहे म्हणून; पण इथे कुठे दिसेना. सो विचारलं.”

“ती आता तिच्या नवऱ्यासोबत असते.” तो म्हणाला आणि आदितीच्या चेहऱ्यावर एक मोठ्ठं प्रश्नचिन्ह पडलं. मग तो मॅगी खाता खाता तिला सांगू लागला, “आम्ही लग्न करणार होतो. हा फ्लॅट तिनेच निवडला होता. सगळं फर्निचर, भांडी, बेड, सगळं काही आम्ही एकमेकांच्या पसंतीने घेतलं होतं.” 

तो बोलता बोलता थांबला. आदितीला आता उत्सुकता लागली होती. ती म्हणाली, “पुढे काय झालं मग?”

“पुढे लॉकडाऊन (lockdown) पडला आणि ती गावी अडकली. आणि तिकडेच मग ती लग्नाच्या बेडीत देखील अडकली. बस्स एण्ड ऑफ दी स्टोरी (end of the story)!” तो निरागसतेनं म्हणाला.

“सो सॅड.” ती एवढचं म्हणाली आणि तिने उरली सुरळी मॅगी संपवून टाकली.   

आदितीच्या झोपण्याची व्यवस्था त्याने आत बेडरूममध्ये करून तो बाहेर डोळे मिटून गाणं बारीक आवाजात ऐकत सोफ्यावर आडवा झाला होता. केकेचं (best of the kk) (singer kk) जिंदगी दो पल की (zindgi do pal ki) हे गाणं सुरू होतं.

अचानक त्याला त्याच्या पायाशी बारीकशी हालचाल झाल्याची जाणीव झाली. तो दचकून उठला. त्याच्या पायाची आदिती मुसमुसत बसली होती.

“आदिती? आर यू ओके (are you ok)?” त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला दिलासा देत विचारलं. तिने डोळे पुसतच नकारार्थी मान हलवली.

“काय झालं? तू ठीक तर आहेस ना? भीती वाटते आहे का तुला?” त्याने विचारलं. तिने पुन्हा नकारार्थी मान हलवली.

“मग? अशी अचानक तू का रडते आहेस?” तो असं म्हणताच ती आता हमसून हमसून रडू लागली. हुंदके देतच.

“तोही मला सोडून गेला रे किरण. फसवलं रे त्याने मला. खूप मुश्किलीने त्याचा पत्ता मिळवला होता. म्हणून आले होते मी पुण्याला. जाऊन बघते घरी तर कळले की त्याला बायका पोरं पण आहेत. असे कसे असतात रे लोक? आणि त्याला मी माझं सर्वस्व बहाल केलं होतं. शी.. माझी मलाच घृणा वाटतेय!” ती रडत रडत म्हणाली. किरण तिच्या शेजारी बसून तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करत होता.

“तू मघाशी विचारलं होतंस ना, की पावसात भिजायची मला सवय असेल म्हणून.?” तिने विचारलं. त्यावर त्याने नुसती मान हलवली.

“नाही रे आवडत मला पावसात भिजायला. नाही आवडत. मुळात मला पाऊसच नाही आवडत; पण आज भिजले मी पावसात. त्याच्यासाठीच. आणि आता मला कुणीच आवडत नाही. ना पाऊस, ना तो, ना मी! कुणीच आवडत नाही रे मला!” ती आता किरणच्या छातीशी बिलगून रडू लागली. त्यानेही आपले हात तिच्या भोवती लपेटले आणि तिला तशीच आपल्या छातीशी धरून ठेवली.

सकाळी वनाजच्या (vanaz corner) बसस्टॉपवर ती उभी होती. कालच्याच कपड्यांत; पण आता ते सुकले होते. आकाश स्वच्छ होते. सूर्य आपल्या प्रकाशाने तिला प्रसन्न करत होता. तशीही तिच्या चेहऱ्याची कळी आज भलतीच खुलली होती. जाम प्रसन्न वाटत होती ती.

समोरून रोडवरून वाहनांची चांगलीच वर्दळ सुरू होती. प्रत्येकाला एक वेगळी गतीच मिळाली होती जणू.

तिचा फोन वाजू लागला. मावशीचा होता तो. तिने हसऱ्या चेहऱ्याने तो उचलला आणि कानाला लावला.

“आदिती अगं कुठे आहे तू? आणि ठीक आहेस का तू? ते मोऱ्यांच्या इकडे फोन..” एक चिंताग्रस्त आवाज कानी पडला तिच्या.

“सांगते सगळं मावशी.” मावशीचं बोलणं मध्येच थांबवत आदिती म्हणाली.

“ते जाऊ दे. तो भेटला का?”

“ तो नाही भेटला मावशी; पण तो भेटला मला.”

“म्हणजे भेटला की नाही भेटला?”

“मावशी मी येऊनच सांगते ना सगळं. बाय.” असं म्हणून आदितीने कॉल कट करून दिला.

[समाप्त]

हे पण वाचा:

डू यू लव मी ?

हल्ली हल्ली सुचतच नाही

चिमणी गेली उडून

रुपेरी रिंगण, भाग ४

रुपेरी रिंगण, भाग ३

रुपेरी रिंगण, भाग २

रुपेरी रिंगण

आपली व्हायरस ही कथामालिका पहिल्यापासून वाचण्यासाठी खालील लिंकला जा.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

लेखणी संग्रामच्या आणखी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

माय व्हॅलेंटाईन

न्यू इयर पार्टी नाईट भाग ५

 marathi sahitya, marathi stories, marathi pranay katha, marathi goshta, chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, साहित्य, मराठी साहित्य, मराठी कथा, story in marathi, marathi kadambari,

chan chan goshti marathi, marathi story pdf, marathi love story, horror story in marathi, pratilipi marathi love story, marathi bodh katha, moral stories in marathi, marathi novels, small story in marathi with moral


Spread the love

1 thought on “पावसात भिजलेली एक परीराणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *