• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ६, अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग १

व्हायरस: प्रकरण ६, अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग १

Spread the love

व्हायरस: प्रकरण ६

अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट A girl in the latex suit

त्या व्यक्तीच्या त्या वाक्यांनी अश्वथच्या कर्णपटलांवरती इतका पिंगा घातला होता की त्याच्या कानाचे पडदे जणू बधिरच झाले होते. त्याला त्याच्या वाक्यांशिवाय आता तरी दुसरे काहीच ऐकु येत नव्हते. कुणीतरी आतमध्ये घुसखोरी केली होते intruder alert एवढेच काय ते त्याच्या डोक्यात शिरले होते आणि म्हणून त्याला तिथून बाहेर पडायचे होते. पण कोणी केली होती घुसखोरी? A girl in the latex suit

टॉर्च सुरु करून आता ते दोघेजण भराभर पायऱ्या चढू लागले. तारा अश्वथला बाहेरचे अपडेट्स देत होती. कदाचित पोलीस असतील या भीतीने ते जोरजोरात जिने चढत होते. मनगटावरील होलोग्रॅम जरी सुरू असला तरी त्यावरूनदेखील काही निष्पन्न होत नव्हतं. त्यात अश्वथचं तरी तिकडे लक्ष कुठे होते म्हणा! A girl in the latex suit

 “घुसखोर आतमध्ये दाखल. घुसखोर आतमध्ये दाखल.” ताराने पुन्हा दोघांना सावध केले. पाच मजले भराभर वर चढून त्यांचे पाय आता गळून गेल्यासारखे झाले होते. अजून एखादी पायरी चढायची म्हटले असते तर त्यांनी सपशेल लोटांगणच घातले असते.

वरती ते तळमजल्यावर येतात न येतात तोच अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. दोघेही अगदी बेसावध होते. एका काळ्या bodyfit बॉडीफीट लॅटेक्स रबरी सुटातली मुलगी त्यांच्यावर अक्षरशः तुटून पडली होती. तिचा चेहरा पूर्णपणे झाकलेला होता, फक्त डोळेच काय ते तेवढे उघडे होते. तिने त्यांना प्रतिकार किंवा प्रतिहल्ला करायला काही वेळच दिला नाही ना कसली संधी दिली. जणू काही मार्शल आर्टमध्ये निपुणता प्राप्त असल्यासारखी ती त्या दोघांना लाथाबुक्क्या हाणीत होती आणि ते दोघेपण थोडाबहुत प्रतिकार करत मनसोक्त तिचा मार खातच होते. upper body workout, joe wicks workout

a girl in the latex suit
a girl in the latex suit: pictures are for illustration purposes only.

शत्रू जेव्हा बेसावध असतो तेव्हाचीच वेळ त्याच्यावर हल्ला करण्यासाठी खऱ्या अर्थाने योग्य म्हणावी लागेल. ना त्याला प्रतिकार करायला वेळ मिळतो ना प्रतिहल्ला! झालेला आघात, झालेला हल्ला, बसलेला धक्का सोशीत त्याला एकेक पाऊल मागे जाणे मग भागच पडते अशा वेळी!

त्यातही नेमका हल्ला होतोय कोणत्या बाजूने याचाच ठाव लागत नसेल तर अशा गनिमी काव्याचा सामना करणे कुणालाही सहज शक्य होत नाही. ना मराठ्यांच्या तावडीत सापडलेल्या तेव्हाच्या मोगलांना शक्य झालं होतं ना आज लॅटेक्स सुटातल्या त्या चंचल बालेच्या तावडीत सापडलेल्या अश्वथ आणि सुब्बूला!

उलट्या सुलट्या उड्या घेत लाथाबुक्क्या देताना टाईटबॉडी tight body लॅटेक्स सुटातून तिच्या डौलदार नी कमनीय बांध्याचे figure दर्शन घडत होते आणि अश्वथ त्या दर्शनाचा लाभ घेत बिनधास्त आणि मनसोक्त मार खात होता. तेही स्लो मोशन मध्ये. slomo videos, slow motion videos, how to make slow motion videos for insta reels and tiktok

बिचाऱ्या त्या सुब्बूने तर केव्हाची हार मानली होती. एका खांबाला पाठ टेकून तो हतबल होऊन अश्वथची धुलाई पाहत होता. अश्वथचा हरेक वार ती लीलया चुकवित होती आणि त्याच्या चुकवलेल्या वाराला ती प्रतिवाराने उत्तरही देत होती. दिसायला नाजुक असली तरी तिचे वार काही नाजून नव्हते. त्या मादक शरीराच्या आड एक दाहक स्त्री अगदी कणखर हल्ले करीत होती!

त्या मुलीने अश्वथच्या छातीत एक जोराची लाथ घातली आणि तो जिन्याच्या पायऱ्यांवर आपटला व घरंगळत खाली गेला. डोक्यावरून पाटीवर, पाटीवरून ढुंगनावर आणि परत ढुंगनावरून पोटावर! बिचाऱ्याचा खुळखुळा झाला नसता तर नवलच!  

अश्वथकडचा मोर्चा आटोपून ती आता सुब्बूकडे चालत आली. त्याच्याजवळ येऊन तिने त्याच्यावर पल्स गन pulse gun रोखून धरली आणि एक हात पुढे करत म्हणाली, “क्रिप्टोरूपी.” crypto, safemoon crypto,cryptocurrency ban

त्याने ते मोबाईल mobile device सारखं उपकरण खिश्यातुन काढलं आणि तिला देण्यासाठी हात पुढे केला.

“घुसखोर चेतावणी. घुसखोर चेतावणी.” ताराने पुन्हा एकदा अश्वथला सावध केलं. पोलीस सायरनचा आवाज येऊ लागला. लागलीच तिने ते उपकरण सुब्बूच्या हातातून हिसकावून घेतले आणि उलट्या गनने त्याच्या नाकावर जोराचा ठोसा ठेवून दिला व तिने तिथून पळ काढला. वेदनेने तो विव्हळला खरा. त्याच्या नाकातून रक्तही वाहू लागले. ताराने पुन्हा सूचना दिली.

ती मुलगी पळून जाताना तिच्या मोटारसायकलचा झालेला आवाज अश्वथला जणू ओळखीचाच वाटला. काल त्याला हुलकावणी देऊन पळ काढणाऱ्या त्या व्यक्तीच्या मोटारसायकलीचा देखील आवाज अस्साच होता अगदी. पण विचारांच्या तंद्रीत असताना सुब्बूच्या हाकांनी त्याची ती तंद्री तुटली.

“अश्व्या पळ राव, पोलीस आले, पोलीस.” असे म्हणत सुब्बू उठला आणि बाहेर पडण्यासाठी निघाला. 

“च्यायला, आज सगळ्यांनीच आमचीच घ्यायची ठरवलंय की काय!” असे म्हणत अश्वथ धडपडत पायऱ्या चढु लागला. सायरनचा आवाज जसजसा मोठा होऊ लागला तशी त्याने ताराला मोटारसायकल काढण्याची आज्ञा दिली. मार खाल्ल्यामुळे तो लंगडत लंगडत पळत होता.

इमारतीतून बाहेर पडताना त्याने सुब्बू  मोटारसायकलीवर भुर्रर्रकन निघून गेल्याचेही पाहिले. तितक्यात त्याचीपण मोटारसायकल मागून आली. पळता पळता मोटारसायकलीवर बसण्यासाठी त्याने झेप घेतली खरी; पण मोटारसायकल पुढे निघून गेली आणि तो धपकन खाली आपटला.

मागून पोलीस येत होते. वेळ दवडून चालणार नव्हतं. पुढे गेलेली अश्वथची मोटारसायकल पुन्हा झर्रर्रकन मागे वळली, तसा तो तयार झाला. आता तो ही संधी सोडणार नव्हता. त्याच्याजवळ येऊन वाकडी होऊन त्याला वेढा घालत मोटारसायकल वळली, तसा तो तिच्यावर झेप घेत स्वार झाला आणि सुसाट निघून गेला. अगदी हॉलिवूडपटागत best hollywood movies of 2021! मग मागून त्याचा ड्रोनही flying a drone सर्रर्रकन येऊन त्याच्या मनगटावर विसावला. आता तो काहीकेल्या पोलीसांना सापडणार नव्हता.

“थोडंफार खरचटण्यापलीकडे शरीराला कुठेही गंभीर इजा नाही, अश्वथ.” तारा म्हणाली आणि तिने आपलं बोलणं पुढे सुरू ठेवलं, “मी चेतावणी देऊन सुद्धा तू सावध नाही राहिला.”

“ओह, …….. थँक्यू तारा.” तो तिला गप्प करण्यासाठी म्हणाला.

“मी तुझ्याकडून थँक्यू म्हणून घेण्यासाठी नाही म्हणाले.” तारा म्हणाली आणि थोडे थांबूनच ती पुन्हा म्हणाली, “कधीकधी तू मला तुझी गर्लफ्रेंड असल्यासारखी वागणूक देतोस.” 

“मग तर मी तुला सॉरी म्हणूनच टाकतो. बट यू नो तू माझी गर्लफ्रेंड नाही होऊ शकत. टेक्निकली आय एम युवर फादर बाय दी वे.” अश्वथ तिला चिडवत म्हणाला. मनात मात्र मगाच्या त्या मुलीबद्दल एक ना धड लाखो विचार घोळत होते त्याच्या. मोटारसायकल आता बाणेर हिल्स baner hills वरती आली जिथे तो राहत होता.

“काळजी नसावी. चेहरा झाकलेला असला तरी मी त्या मुलीचे रॅटीना नमुने ratina scan घेण्यात यशश्वी झाले आहे.”

“दॅट्स माय गर्ल!” अश्वथ उद्गारला.

“नाव आर्या, वय बावीस. कम्युनिटी डेटाबेसवर mysql community server तिची एवढीच माहिती उपलब्ध आहे.” तारा त्याला त्या मुलीची माहिती देत म्हणाली.

“आर्या ….हं …!” अश्वथ स्वतःशीच पुटपुटला आणि पुन्हा तो तिच्या विचारांत हरवून गेला. मनात खूप सारे प्रश्न अनुत्तरित होते- कोण होती ती? काल का वाचवलं असेल तिने मला? मग आज का हल्ला केला असेल तिने माझ्यावर? कधीपासून होती ती माझ्या मागावर?

“आर्या. असेल कुणीतरी.” तो पुन्हा स्वतःचीच पुटपुटला. मात्र आता ओठांवर एक मंद स्मितहास्य होते त्याच्या आणि डोळ्यांसमोर तिचा मघाच्या तिच्या साहसी अदाकारींनी भरलेला तिचा तो अॅक्शनपॅक्ड परफॉर्मन्स!

तिचा तो शरीराशी एकरूप झालेला तंग असा लॅटेक्स सूट, त्यातून होणाऱ्या तिच्या वक्राकार अंगांचे curves in women दर्शन, चंचल, चपळ तेवढीच कणखर, कठोर. आणि डोळ्यांतून प्रतीत होणारी भेदकता व तितकीच मादकता. अहाहा! अश्वथला जिथे जिथे मार बसला होता तिथे तिथे आता तिच्या विचाराने जणू गुदगुल्याच होत होत्या!

[पुढे सुरू राहील]

व्हायरस ही कथा मालिका सुरवातीपासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २

लेखणी संग्रामच्या बाकी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

भाऊबीज भाग १

अजून दिवाळी आहे

तोही होई तेंडुलकर !


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *