• Pune, Maharashtra
व्हायरस
व्हायरस: प्रकरण ६, अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग २

व्हायरस: प्रकरण ६, अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग २

Spread the love

मागच्या भागात आपण पाहिले की लॅटेक्स सुटातल्या अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट a girl in the latex suit त्या मुलीने, आर्याने अश्वथ आणि सुब्बूवर हल्ला करून त्यांच्याकडून ते उपकरण हिसकावून घेतले होते आता पुढे.

अ गर्ल इन दी लॅटेक्स सूट,भाग २ , a girl in the latex suit part 2

रात्रीच्या त्या किर्रर्र अंधारात दुपारची ती इमारत आता एखाद्या भुताटकीपेक्षा कमी भासत नव्हती. वरून संथपणे बरसत असलेल्या पावसाच्या थेंबांनी आजूबाजूंच्या त्या मोठाल्या वृक्षांच्या पानांचा होणारा तो सळ्ळ आवाज मनात जणू भीतीच दाटवत होता. त्यात भरीस भर म्हणून सदाशिव पेठेत sadashiv peth pune रात्री कोल्हया- लांडग्यांची साथ देखील होती.त्यांच्या त्या आरडण्याने सारा परिसर जणू दणाणूनच सोडला होता. मोकाट कुत्र्यांच्या आणि त्यांच्या तर स्पर्धाच सुरू असल्यागत आवाज येत होते कानी.

a girl in the latex suit
a girl in the latex suit: pictures are for the illustration purposes only.

अशातच दुरून एक मोटरसायकल आपला उजेड पाडीत अगदी सावकाशच पावसाचे थेंब झेलीत तिथे दाखल झाली. इमारतीच्या खाली पोहचताच तिची गुरगुर बंद झाली आणि एक इसम तीवरून खाली उतरता झाला. अंगी पूर्णपणे काळा पेहराव चढवलेल्या त्या इसमाची गहिरी नजर कशाचा तरी शोध घेत होती तिथे. डोक्यावर  हेल्मेट असल्या कारणाने त्याचा चेहरा काही स्पष्ट दिसतच नव्हता.

हातात एक उपकरण घेऊन तो त्यावरील होलोग्रॅम डिस्प्लेवर hologram display काहीतरी पाहत सावकाश त्या इमारतीत शिरला. परंतु आतमध्ये खूपच अंधार असल्यामुळे त्याला आपला टॉर्च सुरू करणे भाग पडले. त्या टॉर्चच्या उजेडात तो मग काही मजले उतरून खाली आला.

कशाच्या तरी शोधात होता तो; पण कशाच्या? इमारतीच्या तळखोलीत खितपत पडलेल्या त्या व्यक्तीच्या शोधात तर आला नव्हता ना तो? कुणास ठाऊक? वरकरणी शांत अशा सागराच्या त्या खोल तळाशी कित्येक रहस्ये दडलेली असतील त्यांचा कुणास कधी थांग लागला आहे? तसेच त्या व्यक्तीच्या एकूण अवस्थेवरून तर नक्कीच काहीतरी भयावह कारण असावं त्याच्या त्या तळखोलीत खितपत पडण्याचे! एवढे मात्र नक्की होते.

“शंभर क्रिप्टो होतील याचे.” एक रुपयाचे नाणे अगदी डोळ्यासमोर धरून भंगारदिवे पुढे बसलेल्या अश्वथ आणि सुब्बूला नाकातून आवाज काढीत म्हणाला तसे ते एकमेकांकडे पाहू लागले. अश्वथच्या कपाळावर डाव्या बाजूला एक छोटी पट्टी होती तर सुब्बूच्या नाकाला एक पट्टी लावली होती. रात्री ते दोघेजण त्या व्यक्तीने दिलेले ते नाणे घेऊन, गर्दीने गजबजलेल्या अशा जे. एम. रोडच्या जुन्या बाजारातील एक दुकानदार पितळेश्वर भंगारदिवेकडे विकण्यासाठी आले होते.

पितळेश्वर भंगारदिवे नावाप्रमाणेच अजब आणि गजब आसामी होता. जुन्या मौल्यवान वस्तूंच्या खरेदी-विक्रीचे तसेच सोबतच त्या वस्तूंच्या दलालीचे देखील काम तो करीत होता.

डोक्यावरती पटका घातलेला, कपाळावर ईबितीचे आडवे पट्टे, कानांत प्लॅटिनमच्या जाडजूड मुदया असलेला त्याचा चेहरा जणू हसऱ्या बुद्धागत वाटत होता. त्यात भर म्हणून त्याने आपल्या मिशांच्या चक्क वेण्याच बांधल्या होत्या आणि त्यांची टोके त्याने सोन्याच्या कडीने कानांतील मुदयांना जोडून दिली होती. तोंडात कायम पानाचा विडा रंगलेला आणि बोलण्यासाठी तोंड उघडताच मग नजरेस पडे तो एक विचित्र देखावा. विड्याने रंगलेल्या त्याच्या तोंडातून बाहेर डोकावणारे त्याचे चार-दोन सोन्या-चांदीचे दात!

“पण २००० सालचे नाणे आहे हे. त्यानुसार हजार क्रिप्टो तरी मिळायलाच पाहिजेत.” सुब्बू आत्मविश्वासाने म्हणाला.

“नोटा आणि नाणी चलनातून बंद होऊन तीस वर्षे होऊन गेली. आता हे भंगारात पण घेणार नाही कुणी. मी फार तर दीडशे क्रिप्टो crypto future in india देईन. बघा.” भंगारदिवे म्हणाला.

“काय भंगारदिवे,  अगदी नावाप्रमाणे भंगार सौदा करतोस यार तू पण. जरा सैल सोड हात.” अश्वथ चढया भावाची अपेक्षा ठेवत त्याला म्हणाला.

“नावात जरी आपल्या भंगार असलं ना, तरी सौदे आपले अंगार असतात अंगार.” आपली पांढरी दाढी पिळत तो त्यांना म्हणाला.

“दीडशेच्या सौदयाला अंगार? व्वा रे व्वा.” सुब्बू म्हणाला.

“मंजूर असेल तर बसा नाहीतर उठा इथून.” तो मग काहीसा चिडूनच म्हणाला.

“भंगारदिवे? पहिल्यांदा बसलोय का आपण?” अश्वथने काहीशा मोठ्या आवाजात त्याला विचारल्यावर तो काहीसा वरमला आणि म्हणाला, “न् न्  नाही;पण.”

“पण बिन काही  नाही. तुला वाटत असेल तर आम्ही दूसरा शोधू. दे इकडे ते नाणे.” असे म्हणत नाणे घेण्यासाठी अश्वथने आपला हात पुढे केला.

“अरे पण.”

“तुझं पण ठेव रे तुझ्याकडे.” सुब्बू म्हणाला. इतक्यात तारा अश्वथला म्हणाली, “अश्वथ, आर्या.” 

“आर्या!” तिचं नाव ऐकताच तो उद्गारला आणि सावध होत पुढे त्याने  ताराला विचारले, “ओह आर्या? कुठे आहे?”

“ती भंगारदिवेंच्या दुकानात शिरली आहे.” तारा  लगेचच म्हणाली.

इकडे त्या इमारतीत शिरलेला तो इसम अंधाऱ्या त्या तळमजल्यात टॉर्चच्या मदतीने अजूनही कशाचा तरी शोध घेतच होता तोच त्या अंधारातून काहीतरी चमक त्याच्या डोळ्यास पडली. टॉर्चच्या उजेडात चमकणारे डोळे होते ते. भयंकर डोळे होते ते. एका धिप्पाड लंडग्याचे, लालबुंद नी रागीट!

त्याला पाहताच लांडग्याला चांगलाच चेव चढला. आपले तीक्ष्ण दात विचकीत तो त्या इसमाकडे गुरारत त्याला पाहत होता. तो इसमही खूप सावधगिरीने आणि हुशारीने त्याला सामोरा जात होता. तोच त्याचा पाय एका तुटक्या काचेवर पडला आणि काच फुटल्याचा आवाज झाला.

डोळ्याचे पाते लवते न लवते तोच तो लांडगा त्याच्यावर झेपावला देखील. दोघांचे तुंबळ असे युद्ध सुरू झाले मग. बराच वेळ चाललेल्या त्या झटापटीत एक संधी मिळताच त्या इसमाने आपला धारदार चाकू लीलया त्याच्या छातीत खुपसला आणि त्यासरशी उष्ण रक्ताची एक चिळकांडी बाहेर पडली. लांडगा शांत पडला. कायमचा. रक्ताच्या थारोळ्यात. विव्हळत.

मग त्याच्या त्या उपकरणाचा बीप् बीप् आवाज होऊन त्याला आपल्या होलोग्रॅम डिस्प्लेवरती काही ठिकाणे दिसताच तो भराभर पायऱ्या चढून वर आला आणि आपली मोटरसायकल सुरू करून तो धडकच तिकडे निघाला. आता पाऊस थांबला होता.

इकडे अजून अश्वथ आणि सुब्बूची भंगारदिवेशी बोलणी सुरूच होती.

“बरं चला, तीनशे क्रिप्टो? मान्य आहे का?” भंगारदिवेने पुन्हा त्यांना विचारले.

 त्याच्या हातातील ते नाणे हिसकावत अश्वथ उठला आणि त्याच्याकडे पाहत तो त्याला म्हणाला, “भंगारात द्यायचं असतं  तर तुझ्याकडे कशाला आलो असतो रे भंगारदिव्या?” तो मागे वळताच त्याच्या समोर आर्या हातात ते दुपारी त्यांच्याकडून मिळवलेले उपकरण घेऊन उभी होती. विकायलाच आली असावी बहुतेक.

“तारा?” तिच्याकडे पाहत त्याने ताराला हाक  दिली.

“अहं, आर्या.” ताराने लगेचच उत्तर दिले. अश्वथ आ वासून आर्याकडे नुसता पाहत उभा होता आणि त्या दोघांना पाहत सुब्बू त्याच्याही पेक्षा मोठा आ वासून उभा होता. मात्र अश्वथला अचानक समोर उभा पाहून आर्या काही क्षण थबकलीच!

लगेचच मग सावध होत तिने अश्वथला भंगारदिवेच्या टेबलावर ढकलले आणि त्या उपकरणासहित तिने तिथून पळ काढला.

“सु. . सुब्ब्या, राव राव राव, हीच हीच ती.” असं म्हणून त्याने टेबलावरील भंगारदिवेची गन उचलली आणि तिचा पाठलाग करू लागला. सुब्बू पण त्याच्या मागे धावत सुटला.

“अरे, नकली गन आहे रे ती.” मागून भंगारदिवे ओरडला फक्त, तारा अश्वथला सूचना करत होतीच. जे एम रोडच्या त्या गजबजलेल्या रस्त्याने वाट काढीत ती पुढे धावत होती. आपल्या हाताच्या उपकरणाच्या सहाय्याने अश्वथ तिच्या मागोमाग निघाला होता. सुब्बू मात्र त्याला हाका देत कसाबसा धावत होता.

“अशव्या, सांभाळून रे बाबा. आता नुसत्या पट्ट्या केल्यात. पुढे मला काही प्लास्टर नकोय रे बाबा. तू पकड तिला. मी आलोच मागून. तू पळ.” सुब्बू धावता धावता ओरडत होता. धावताना पावसाने ओल्या झालेल्या रस्त्याचा पचाक् पचाक्  असा आवाज होत होता.  

तिचा पाठलाग करता करता आता अश्वथ झेड ब्रिजला पोहचला होता. तो तिला थांबण्यास सांगत होता मात्र ती तशीच पुढे धावतच होती. शेवटी ती त्या ब्रिजवर जाऊन पोहचली. ब्रिजवर कुणीच नव्हते. फक्त तो आणि ती. दोघेच. बस्स.

“आर्या थांब.” त्याने जोराची हाक मारताच ती जागेवरच थांबली. तो तिच्यावर गन रोखून उभा होता. मघाचपासून धावत असल्यामुळे दोघांचे श्वास चांगलेच फुलले होते.

“ते उपकरण, गिव्ह इट टू मी. दे मला ते. ” त्याने जवळ जात ते उपकरण तिला मागितले.

“माझं नाव कसं माहिती तुला? तू माझा साधा चेहरासुद्धा पाहिला नव्हतास.” तिने ते उपकरण बाहेर काढत त्याला विचारले.

“हं….. जिच्यामुळे माझ्या चेहऱ्याचा नकाशा बिघडला तिची थोडीतरी माहिती मला ठेवायला नको?” असं म्हणत तो तिच्या अगदी जवळ आला. दोघेजण ब्रिजच्या मधोमध होते. सुब्बू धावत ब्रिजच्या तोंडाशी आला. अश्वथला ती सापडली आहे हे पाहिल्यावर तो तिथे गुडघ्यावर हात ठेवून जोरजोरात उसासे टाकू लागला.

“देवा, सांभाळून घे रे माझ्या मित्राला.” आर्या काही त्याला मारमारीत ऐकणार नाही असे समजून तो मोठाले उसासे टाकीत म्हणाला.

अश्वथने उपकरण तिच्या हातातून घेतले तेवढ्यात ब्रिजच्या तोंडाशी गस्तीवर असणारी पोलीस गाडी दिव्यांच्या लखलखाटात  सायरनचा आवाज करीत तिथे आली. तसा सुब्बू मागे वळून पाहू लागला.

पोलीसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अचानक आर्याने अश्वथला आपल्याकडे ओढले आणि तिने त्याचे एक दीर्घ असे चुंबन घेतले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे तो ही चकित झाला. त्याला आता या परिस्थितीत नेमके  काय करावे हेच सुचेना. पोलीसगाडी तिथे असेपर्यंत आर्या काही त्याचे ओठ सोडणार नव्हती.

पोलीस आता आपल्याला पकडणार असे समजून सुब्बू पुन्हा पुढे पाहू लागला तर समोर हे चित्र. तो तसाच डोळे विस्फारून, आ वासून पाहत राहिला.

“किती भूरटेगिरी ही?” असं म्हणत पोलीसाने सुब्बूच्या ढुंगणावर हळूच इलेक्ट्रिक स्टिकचा हलकासा करंट दिला, तशी त्याने जागेवरच टुणुकदिशी उडी मारली.

“वाकून बघण्याइतकं  बेकार दिवस आलं का रे?” पोलीसाने परत त्याला विचारले.

“ते. . . ते. साहेब, आय हॅव ए व्हर्च्युअल बेब .” तो ऐटीत म्हणाला.

“निघायचं इथून. चल फूट. वाकून वाकून दुसऱ्यांना बघायचं आणि म्हणे व्हर्च्युअल बेब. चल फूट.” असं म्हणून तो पोलीस गाडीत बसून तिथून सायरनचा आवाज करत निघून गेला.

उशिरपासून सुरू असलेल्या त्या चुंबनामुळे आपसूक्च दोघांचेही श्वास आता एकमेकांत मिसळले गेले होते. आर्याच्या त्या अकल्पित वागण्याचा सुरवातीला धक्का बसलेल्या अश्वथचे हात आता तिच्या कमरेभोवती स्थिरावले होते आणि तीचे हात अर्थातच त्याच्या मानेभोवती! तिढी देऊन!

एखादं चुंबन अविस्मरणीय होण्यासाठी मागे काही आयफेल टॉवरच असावा असे काही नाही, पुण्यातल्या झेड ब्रिजवर z bridge pune देखील घेतली जाणारी चुंबने अविस्मरणीय असतातच की!

पोलीसगाडीचा आवाज कमी झाला आणि त्यांचे चुंबन थांबले; पण अश्वथ अजून त्यातून बाहेर आला नव्हता. थंडीने थरथरतात तसे त्या दोघांचे ओठ थरथरत होते अगदी! भरलेल्या छातीतून  निघणारे श्वासांचे ते मादक सुस्कारे नी त्याला सुसंगत अशी उभयतांच्या हृदयांची होणारी धडधड अजून कानी पडत होती एकमेकांच्या.

“पार्टनर बनशील माझा?” तिने विचारले आणि तो परत चकित झाला. त्याने तिच्या डोळ्यांत निरखून पाहिले. चुंबनाने डोळ्यांत आणखीनच मादकता दाटवली होती तिच्या! आणि आवाजात खोलपणा. how to find best partner, best partner for

“बनशील?” तिने त्याला पुन्हा विचारले तसा तो भानावर आला.

“क्. . क्. . कोण? मी?  …….. आय   …… या ……. आय मिन ….. नो. …. या. आय डोन्ट नो.” त्याला काय बोलावे तेच सुचत नव्हते.

“टेक युअर टाईम.” ती म्हणाली.

“पण मग तू कुठे भेटशील?” त्याने विचारले.

“मला नाही माहित. . .” तिने हसत उत्तर दिले, “. . आणि हा, याच्यासाठी सॉरी.” त्याच्या कपाळावरील पट्टीकडे बोट करत ती म्हणाली आणि तिने खाली मुठेत उडी घेतली. गायबच झाली ती अगदी! अश्वथ नुसताच पाहत राहिला. लगोलग सुब्बू तिथे आला. अश्वथचा ड्रोन अगोदरच नदीवर दाखल झाला होता. आता त्याची मोटारसायकलही ब्रिजवर आली होती. best drones for shoot

ब्रिजच्या कठड्यांवर हात ठेवून अश्वथ अजूनही खाली मुठेच्या पाण्यातच पाहत उभा होता.

“मज्जा आहे म्हटलं एकजणाची. दुपारी पोटभरून मार आणि रात्री तोंडभरून किस्स्स्स. हे भगवान, कभी हम पर भी रहम किया करो.” आकाशाकडे पाहत तो म्हणाला.

जे एम रोडला एका ठिकाणी आपली मोटरसायकल उभी करून रक्ताने माखलेल्या अंगाने तो इसम आता कशाच्या तरी शोधार्थ इकडे तिकडे पाहत घाईघाईने निघाला होता. लंडग्याने त्याच्या शरीराचे जे लचके तोडले होते त्यातून भळाभळा रक्ताच्या धारा लागल्या होत्या. मात्र वाहणाऱ्या रक्ताची पर्वा न करता त्याचा शोध सुरू होता.! लोक मात्र त्याच्याकडे अगदी भुवया उंचावून नी घाबरून पाहत होते.

मात्र त्याची ती सैरभैर नजर कुणाचातरी शोध घेतच होती! पण कुणाचा?

व्हायरस ही कथा मालिका सुरवातीपासून वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग १

व्हायरस: प्रकरण २.अ वीक ऑफ फ्रीडम,भाग २

लेखणी संग्रामच्या बाकी कथा वाचण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.

भाऊबीज भाग १

अजून दिवाळी आहे

तोही होई तेंडुलकर !


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *