• Pune, Maharashtra

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग २

१. मधुचंद्र :भाग २ – तिच्या मानेवर त्याने आपले ओठ टेकवताच एक सुखद लहर तिच्या नखशिखांत पसरली. रात्रीचे साडेनऊ वाजले होते. श्रीशा विरेनच्या मिठीत निवांत झोपली होती. दिवसभराच्या मौज-मस्तीने दोघेही फार दमून गेले होते. दुपारी त्यांनी जेट स्की ची मजा लुटली होती आणि त्यानंतर ते दोघे जंगल सफारीला गेले होते. त्यात त्यांनी शिकारीचीही मजा लुटली होती.  जंगल सफारी सोबतच त्यांनी […]

सखे शेवटची भेट!

विनवण्या करू कितीएक ना अनेकहाक माझी जाऊदेतुझ्या काळजात थेट सोडवू कसा मीभला पडलाहे पेचचांदण्या अशा त्या रातीसखे शेवटची भेट! लाखो प्रश्न डोक्यामंदीउत्तरं त्यांची देचअबोल प्रीत अशी कशी हीका तुटलाहे पिरतीचा देठ चालतो आहे वाटपरत नको आहे ठेचभरकटलेली नौकाकिनाऱ्याला तू नेच हात माझ्या हातामंदीएकदा तू देचपावलागणिक सोबतीचीशपथ तू आता घेच! -शिवसुत. आपली प्रेयसी सोडून चालली असता तिचा प्रियकर तिला तिच्या नसण्याने […]

व्हायरस: प्रकरण १. मधुचंद्र, भाग १

        १. मधुचंद्र सन २०४७, ऑगस्ट ४. डोंगराच्या कुशीत आणि दासवे लेकच्या काठावर वसलेल्या लवासाला आता वैभव प्राप्त होणार हे नक्की होतं. अगदी वरून पाहिलं असता सभोवती लवासा सिटी, तिथला दासवे लेक आणि त्या  लेकच्या बरोबर मध्यावर एक भलामोठा लाकडी वॉटर विला अगदी तटस्थ उभा असल्यासारखा वाटत होता. त्याच्या शेजारीच पाण्यावरती उभा असलेलं सी प्लेन पाहून असं वाटत होतं की कुणी तरी […]

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni

माझ्या प्रीत सजनी mazya preet sajni आठवतंय का बघ तुला माझ्या प्रीत सजनी जोडी सफेद हंसाची याच तळ्याठायी देखणी देखणी तव तूही तितकीच तितकीच सुंदर मोहिनी हळुच हनुवटीला हात जाता तू लाजून ओढलीस ओढणी आठवतंय का बघ तुला असंख्य अशा त्या चांदराती अगणित प्रतिबिंबे चंद्राची आपण होती पाहिली याच तळ्याकाठी मग कमळ फुलांच्या साक्षी घेऊनी हात हाती प्रेमगीते जी गायली […]

गोदा म्हातारी: भाग २

मनात कसलातरी विचार करून तो व्यापारी तिला म्हणाला, “दहा पैशाला एक अंडं हाय म्हातारे, तेवीस अंड्यांचं दोन रुपय अन तीस पैसं हुत्यातं.” असं म्हणून त्याने खिश्यातुन दहा-दहा पैशांची चिल्लर बाहेर काढून तिच्या हातात ठेवली.         “मोजून घी बाय.”         “मला अडाण्याला काय जमणार हाय मोजायला? तू इस्वासानं मोजून दिलं म्हंजी बास की.” असे म्हणत तिने ओंजळीत ती चिल्लर […]