• Pune, Maharashtra

बॅरिस्टर

            हाताच्या दोन बोटांच्या मधून पचाकदिशी तोंडातील तंबाखूची गढूळ पिचकारी मारून, थोडासा भीतीने कावराबावरा होऊनच सर्जेराव आटपाडी पोलीस स्टेशनात घुसला. पायांत पन्हे तुटलेली चामड्याची काळी चप्पल, गुडघ्यापर्यंत लोंबणारे मळकट धोतर, तेवढीच मळकट असलेली बंडी आणि त्या बंडीपेक्षाही मळकट होता तो पोटावर असेलेला बंडीचाच खिसा! पान, कात, तंबाखु, चुना अशा त्याच्या निरनिराळ्या सवयींमुळे बंडीचा तो खिसा […]

छाटले जरी पंख माझे

  छाटले जरी पंख माझे उडणार मी जरूर आहे उत्तुंग भरारी घेण्याची जिद्द माझ्या रक्तात का उगाच आहे?   जाहले गलीतगात्र, मूर्च्छितमात्र छिन्न विछिन्न तन परि राखेतूनही पेटून उठणारा धगधगता निखारा का मी उगाच आहे?   सापडे ना वाट जरी गडद अशा या तिमिर राती किर्रर्र काळोख सुरंगी अंती पेटलेली मशाल का मी उगाच आहे?   ठाकले कित्येक जरी मेरू […]

नारायण. . . नारायण

नारायण. . . नारायण            आज इंद्राचा दरबार खचाखच भरलेला होता. देवाधिदेव इंद्र आपले दोन्ही बाहू आपल्या सुवर्ण सिंहासनावर विसावून क्रोधीत नजरेने एकटक समोर पाहत बसले होते. त्यांचा सुवर्ण मुकुट आज जरी झळाळत असला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे तेज मात्र गायब होते. त्यांच्या सिंहासनाच्या एका बाजूला नाथ तर दुसऱ्या बाजूला उद्धव आपापली आसने ग्रहण करून बसले होते व त्यांना लागूनच दोन्ही […]