स्वर्गाची शिडी!
मध्यरात्र उलटून खूप वेळ झाला होता. किशनला आता एक पाऊलही पुढे टाकणे कठीणझाले होते. खांद्यावर दीड वर्षाची मुलगी, सोबत चार वर्षाचं पोरगं आणि डोक्यावर छोटंसं गाठोडं घेऊन त्याच्याइतक्याच जड पायांनी रेल्वेच्या पटरीवरून चालणारी त्याची बायको, यांना घेऊन तो दिवस मावळायला जालन्याहून औरंगाबादेच्या दिशेने निघाला होता. […]
यशोदा: भाग-१
यशोदा भाग १ अंधाऱ्या राती नाजुक पण कोरीव अशी चंद्रकोर आणि त्याभोवती चांदण्यांनी धरलेला फेर पाहून कुणाला त्यात सामील व्हायची इच्छा झाली नाही तर नवलच! त्यात भर म्हणून असलेली रातकिड्यांची किर्रर्र व मधूनच वाऱ्याच्या मंद झुळुकांमुळे सळ्ळ होणारा पिंपळाच्या पानांचा आवाज जणू संगीताचा भासच करवत होते. मधूनच पिकलेले जांभळ खाली पडून टप्प असा […]
पेसमेकर
आतमध्ये खिडकीलाच लागून असलेल्या लोखंडी कॉटवर दुपारचे कडक ऊन पडले होते. उन्हाने कॉटवरची गादी जसजशी तापू लागली तसे, आत दबा धरून बसलेले लठ्ठ ढेकूण एकेक करून बाहेर पडू लागले how do you get rid of bed bugs. मानवी रक्ताची oxygen level in human blood लट लागलेले ते रक्तपिपासू असे सहजासहजी हार मानणाऱ्यांतले नव्हतेच मुळी! […]
शाश्वत प्रेम.!
शाश्वत प्रेम ते फूल किती सुंदर होतं..! हे त्या भुंग्याला देखील माहीत होतं. दिवसभर त्याच्याभोवती पिंगा घालून, उद्या ते कोमेजणार हे त्यानंही जाणलं होतं. कळीचं फूल आणि त्या फुलावर प्रेम त्याने का उगाच केलं होतं? आपण शाश्वत नसलो तरी प्रेम शाश्वत असतं हे त्या फुलाला देखील मग उमगलं होतं.! -शिवसुत
पाऊले चालती ..!
“आवं, बास की.” “संगे,अजून थोडा वेळ. मग झालं.” “आता माझ्याच्यानं न्हाय हुनार. लई तरास व्हायला लागलाय.” “अगं एका पोराची आय हाय तू. असं काय नव्या नावरीगत करत्याय. थोडी कळ काढ की, मग थांबू.” संगीच्या […]
Recent Comments