• Pune, Maharashtra
कविता
हे रंगबिरंगी फुला..!

हे रंगबिरंगी फुला..!

छायाचित्र:संग्रामसिंह कदम

 

 

क्षणभंगुर आयुष्य जरी 

माहितसे कुसुम तुला 

आज फुलायचे 

वाऱ्यावर डोलायचे 

भ्रमराशी त्या  

रों रों करत

प्रेम गीत मग

मस्त गायचे

 

गंध दरवळूनी 

रंग उधळायचे 

खूप जगुनि मग 

उद्या मिटायचे 

कसे जमते रे तुला 

एक साधा 

प्रश्न माझा 

हे रंगबिरंगी फुला..! 

         -शिवसुत.

2 thoughts on “हे रंगबिरंगी फुला..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *