• Pune, Maharashtra
कथा
यशोदा: भाग-१

यशोदा: भाग-१

यशोदा

भाग १   

yashoda
yashoda

        अंधाऱ्या राती नाजुक पण कोरीव अशी चंद्रकोर आणि त्याभोवती चांदण्यांनी धरलेला फेर पाहून कुणाला त्यात सामील व्हायची इच्छा झाली नाही तर नवलच! त्यात भर म्हणून असलेली रातकिड्यांची किर्रर्र व मधूनच वाऱ्याच्या मंद झुळुकांमुळे सळ्ळ होणारा पिंपळाच्या पानांचा आवाज जणू संगीताचा भासच करवत होते.

         मधूनच पिकलेले जांभळ खाली पडून टप्प असा आवाज करी, तर दुरून कुठूनतरी ऊसाच्या फडातून कोल्हेकुई कानी येई. खिडकीच्या फटीतून गार वारा आत शिरून जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या पडद्याला आपल्या तालावर पद्धतशीर नाचवत होता आणि घराच्या दगडी भिंतीच्या आधाराने वाढलेल्या रातराणीच्या फुलांचा तो गर्द सुगंध आपल्यासोबत आणून अख्ख्या घरभर उधळीत होता!
          लग्नात सासऱ्याने दिलेल्या व आंब्याच्या लाकडापासून घडवलेल्या मजबूत पण कोरीव अशा पलंगाच्या king size bed पायाला लागलेला भुंगा त्याला आतून पोखरून काढत होता आणि त्याच पलंगाच्या उजव्या बाजूला शामराव निवांत घोरत पडले होते; पण शेजारीच पडून राहिलेल्या यशोदेला मात्र काही केल्या झोप येत नव्हती.

          पाण्याने गच्च भरलेल्या डोळ्यांनी ती एकटक घराच्या कौलारू छताकडे पाहत होती. समुद्राला उधाण यावं आणि त्याच्या उंचच उंच लाटा वरती उसळाव्याततशाच तिच्या मनाच्या समुद्राच्या लाटाही उंच उसळत होत्या. नवरा आपल्याला ओळखण्यात कमी पडला की एक बायको म्हणून आपण आपल्या नवऱ्याला ओळखण्यात कमी पडलो, जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाला एक आगाऊ प्रदक्षिणा घालणारी मी आज मात्र अशी उद्विग्न होऊन पडून राहिलीय, असे नानाविध विचार तिच्या मनःसागरात थैमान घालीत होते. त्यात भर म्हणून भुंग्याच्या पोखरण्याचा आवाजही चांगलाच होत होता!
          “च्यायला ह्या भुंग्याचा बंदोबस्त करायला लागतोय एकदाचा!” शामराव एका अंगावर होत झोपेतच पुटपुटले व क्षणातच पुन्हा घोरू लागले.
          भरलेल्या डोळ्यांनी यशोदाही एका अंगावर झाली तसे तिच्या डोळ्यांतले अश्रू खाली ओघळून डोक्याखालील उशीमध्ये आटून गेले. तिची नजर भिंतीवरील लंबकाच्या घड्याळावर स्थिर झाली होती. 

          पहाटेचे तीन वाजले होते तरीदेखील यशोदेचा डोळा लागत नव्हता. पलंगाला लागलेल्या भुंग्याचा बंदोबस्त करता येईलही; पण यशोदेच्या मनाला लागलेला तो भुंगा मात्र यशोदेला आतून पोखरून काढीत होता. त्याचा बंदोबस्त फक्त तिलाच करावा लागणार होता.!
          घड्याळाच्या काट्यांकडे पाहत ती आपल्या भूतकाळात कधी हरवून गेली तिलाच कळले नाही.
          “काय गं यशोदे, बाळ झोप नाही लागत वाटतं तुला?” माई अंधरूणावर टेकत म्हणाली. तशी एका अंगावर होऊन पडलेली यशोदा माईकडे वळली आणि तिच्या कुशीत जात म्हणाली, “बाळ पण म्हणतेस आणि बाळाला सासरी पाठवण्याची घाई पण करतेस.”
          माई तिच्या बोलण्यावर नुसती हसली.
          “अगं माई, इतक्यात मला नाही ना गं जायचं सासरी. मला अजून तुमच्यासोबत राहायचं आहे ना, सरूबरोबर जिबल्या खेळायच्या आहेत, पोरांच्यात सुरफाट्या आणि सुरपारंब्या खेळायच्या आहेत, आंब्याच्या कैऱ्या पाडायच्या आहेत, तुझ्याकडून दोन दोन वेण्या घालायच्या आहेत आणि ना आपल्या सुंदरीची सकाळ-संध्याकाळ धार पण काढायची आहे.”
          “पाठराखीन म्हणून पाठवते की सुंदरीला तुझ्यासोबत. बसा मग दोघी मिळून माहेरच्या गोष्टी करत.”
          “माई, सांग ना गं तू आप्पांना.”
          “उगीच वेडेपणा नकोस करू यशोदे बरं. शामराव कचेरीत कारकून आहेत आणि खूपच सद्गृहस्थ आहेत हं ते. तुला अगदी फुलाप्रमाणे जपतील बघ पोरी.”
          “माई, उद्या ते फक्त मला बघायला येणार आहेत हं. पसंत नापसंत तर होऊ देत. म्हणे फुलाप्रमाणे जपतील.”
          “न पसंत पडायला काय झालं? आहेच माझी यशोदा देखणी. लाखात एक.”
          “काहीतरीच काय गं माई?” असे म्हणत ती लाजली.
          “बापरे,लेकरू लाजलं आमचं.” असे म्हणत माईने तिच्या डोक्यावरून हात फिरवला व अचानक उद्याच्या तयारीचा विचार मनात आल्याने ती तिला म्हणाली, “बरं, आता झोप तू यशोदे. उद्याच्याला पोह्यांवर टाकायला ओल्या नारळाचं खोबरं किसून ठेवून आलेच मी. बरं झालं बाई आठवलं. नाहीतर सकाळच्या धांदलीत विसरायला होतात छोट्या छोट्या गोष्टी.”
          यशोदेला झोपायला सांगून ती तिथून उठून गेली. नाही म्हटलं तरी यशोदेलाही उद्याच्या कार्यक्रमाची उत्सुकता लागली होतीच! अंगावर चादर ओढून ती भिंतीवरील घड्याळाकडे पाहत, आगामी संसाराची स्वप्ने रंगवत झोपी पण गेली.
          “ये यशोदे.. अगं ये यशोदे. यशोदे..अगं ऊठ की. दिस बघ किती वर आलाय. पाहुणे यायची वेळ झाली. अगं ये यशोदे?” वयानुसार कंप पावणाऱ्या तिच्या सासूच्या म्हणजेच मोठ्या आईच्या आवाजाने यशोदेला अचानक जाग आली.
          “आठ कधीच्या वाजून गेल्यात. कधी आवरणार आहे बाई तुझं? पाहुणे येतीलच.” असे म्हणून सासू तिथून निघून पण गेली.
          रात्रभरच्या विचाराने तिचे डोके अजून भिनभिनत होते. एखाद्या दारू प्यायलेल्या व्यक्तीला सकाळी उठल्यावर जसे डोके जड वाटते, तिचे डोके तसेच जड वाटत होते. स्वतःला सावरायला थोडा वेळ देऊन तिने आपले झोपेत विस्कटलेले केस दोन्ही हातांनी एकत्र करून त्यांचा पद्धतशीर बुचडा  बांधला व पलंगावरून खाली पाय टेकून उभी राहिली आणि भिंतीवरील घड्याळाकडे एक कटाक्ष टाकून सरळ स्वयंपाकघरात Indian kitchen शिरली. मात्र जाता जाता बाहेर व्हरांड्यामध्ये लाकडी झोपाळ्यावर पाहुण्यांच्या स्वागताच्या तयारीत गुंतलेल्या शामरावांकडेही तीक्ष्ण कटाक्ष टाकायला ती विसरली नाही.
          स्वयंपाक घरात प्रवेश करताच तिची सून तिच्या एकदम आडवी आली आणि म्हणाली, “आय्यो, आहे का आत्या, मी आता तुम्हालाच उठवायला निघाले होते. लई वेळ झाला म्हटलं अजून आत्यासाब उठल्या कशा नाहीत म्हणून. . . . . .  काय झालंय, तुमची तब्येत ठीक नाही का आज? बरं नाही का वाटत? यांना सांगू का? दवाखान्यातून आला असता तर बरं झालं असतं. थांबा यांना सांगतेच.”
          “अगं,मला काही झालेलं नाहीये.”
          “असं कसं? थांबा बरं, ताप आहे का ते पाहू द्या जरा.”
          “अगं रेखा, बरी आहे मी.”
          “होय की अहो आत्यासाब. ताप तर नाहीच. मी बिचारी तर घाबरूनच गेले होते की.”
          “बरं ते जाऊ दे आता. मोठ्या आईला दिलं का चहापाणी?” चुलीकडे जात तिने विचारले.
          “हो.”
          “माधुरी?” पितळेच्या हंड्यातून तांब्याभर पाणी copper water benefits घेऊन भांडी घासायच्या ठिकाणी जात तिने विचारले आणि सपासप तोंडावर पाणी मारून तिने आपले तोंड धुतले व पदराने तोंड पुसत ती पुन्हा चुलीकडे आली.
          “ताईसाब आंघोळ करून त्यांच्या खोलीत गेल्यात आत्ताच.”
          “हे काय? सगळी तयारी केलीस वाटतं.” लांब पण बारीक चिरून ठेवलेला कांदा व कढीपत्ता recipe using onion and curry leaves पाहून यशोदा तिला म्हणाली.
          त्यावर सूनबाई फक्त गालात हसली आणि म्हणाली, “पाहुणे आले की लगेच मी पोहे भिजत घालते. तुम्ही आता नका कशाला हात लावू. आंघोळीचं पाणी तापलंय तुमचं. hot water for bath, bathing hot आवरा तुम्ही आत्यासाब.”
          यशोदेने काही क्षण एकटक तिच्याकडे पाहिले आणि नंतर तिच्या गालावरून हात फिरवत तिला जवळ घेतले. सकाळी सकाळी आत्यासाबची माया पाहून सूनबाई पुरती हरकून गेली. सूनबाईला उराशी धरल्यावर मात्र यशोदेला गहिवरून आल्यासारखे झाले. आपसूकच तिच्या डोळ्यांत पाणी आले.
          “आत्यासाब?” यशोदेच्या डोळ्यांतील पाणी पाहून सूनबाई बोलली. कदाचित यशोदेचं ते हळवं रूप तिनं पहिल्यांदाच पाहिलं होतं.
          “आलेच.”
          हाताच्या बोटांनी डोळ्यांतून खाली ओघळू पाहणारी आसवे टिपत ती तिथून निघून पण गेली; पण सूनबाई कसल्यातरी विचारात तशीच उभी राहिली.
           इकडे माधुरी आपल्या खोलीत तिच्या साज शृंगारात व्यस्त होती. तिच्या गव्हाळ रंगावर हिरव्या रंगाची रेशमी साडीअगदी शोभून दिसत होती. साडीची पिन तोंडात पकडून, साडीच्या निऱ्या घालताना तिचे थोडेसे कुरळे पण दाट केस खाली लोंबकळत होते आणि त्यांतून ठिपकणारे पाण्याचे थेंब खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हामुळे जणू मोत्यासमानच भासत होते. साडीच्या निऱ्या तिला काही होत नव्हत्या; मात्र त्या घालताना तिच्या हातातील बांगड्यांचा खळ्ळ आवाज सतत होत होता.
          

6 thoughts on “यशोदा: भाग-१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *