• Pune, Maharashtra
कविता
भीती नाही वाटली !

भीती नाही वाटली !

भीती नाही वाटली !

एक जोराचा वाऱ्याचा झोत येऊन मला थडकला
आणि  म्हणाला, ‘तुला भीती नाही वाटली?’
मी मग क्षणभर थबकलो, अडखळलो, धडपडलो
मग सावरलो आणि म्हणालो-
‘नाही वाटली, भीती नाही वाटली.
भीती वाटायला तू काय वादळ आहे?’

मग पुन्हा एकदा एक वादळ येऊन मला धडकले  
आणि म्हणाले, ‘आता भीती नाही वाटली?’
मी मग क्षणभर लडबडलो,गडबडलो, हडबडलो
मग सावरलो आणि म्हणालो-
‘नाही वाटली, भीती नाही वाटली.  
भीती वाटायला तू काय सुनामी आहे?’ ’

मग पुन्हा एकदा नव्याने एक सुनामी येऊन मला थडकली
आणि म्हणाली, ‘आता भीती नाही वाटली?’
मी...मी मग क्षणभर वाहवलो, आदळलो, आपटलो
मग सावरलो आणि म्हणालो-
‘नाही वाटली, भीती नाही वाटली.
बघ तुझ्या लाटांवरती मी कसा स्वार झालो आहे.’
-शिवसुत