• Pune, Maharashtra
कथा
पेसमेकर

पेसमेकर

          आतमध्ये खिडकीलाच लागून असलेल्या लोखंडी कॉटवर दुपारचे कडक ऊन पडले होते. उन्हाने कॉटवरची गादी जसजशी तापू लागली तसे, आत दबा धरून बसलेले लठ्ठ ढेकूण एकेक करून बाहेर पडू लागले how do you get rid of bed bugs. मानवी रक्ताची oxygen level in human blood लट लागलेले ते रक्तपिपासू असे सहजासहजी हार मानणाऱ्यांतले नव्हतेच मुळी! 
          “पॅरासाईट साले!” असे म्हणत रोहितने एक ढेकूण चिमटेत पकडून उचलत डोळ्यासमोर धरला आणि शेजारीच असलेल्या निरम्याच्या पाण्याने अर्ध्या भरलेल्या मगात टाकून दिला.
          “जगाला तुझं तडपडणं दिसत असेल कदाचित; पण माझं तडपडणं, माझी हतबलता, माझी वेदना मात्र कुणाला दिसणार नाही रे! तू जाशील रे मरून; पण मागे माझ्या पुस्तकांत, माझ्या गादीत, माझ्या अंथरुणात, माझ्या पांघरुणात तुझे जे वारसदार तू ठेवून जाशील ते काय कमी आहेत? मी तुला असं, असं माझ्या हातात चिरडून टाकलेही असते; पण मला माझ्याच रक्ताने माझे हात लाल करायचे नाहीत!”                                                    मगात तडफडत असलेल्या ढेकणाला उद्देशून तो म्हणाला खरं; पण त्याचं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच त्या ढेकणाला जलसमाधी लाभली होती. तो गतप्राण होऊन मगाच्या तळाशी निपचित पडला होता; तर गेला दीड महिना रोहित सदाशिव पेठेत एका खोलीत लॉकडाऊन mumbai lockdown news मुळे अडकून पडला होता.
          स्पर्धा परीक्षेची competitive exam preparation तयारी करणारी मुले आणि वर्षानुवर्षे एकाच खोलीत राहणारी, केव्हाच भाडे न देणारी मात्र स्पर्धा परीक्षेची अजिबात तयारी न करणारी ढेकणं जणु काही सदाशिव पेठेच्या पाचवीलाच पुजलेली होती. रोहीतही असाच सहा वर्षांपूर्वी सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी आला होता.
          खोलीमध्ये स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचा खच पडला होता. एकीकडे इंडक्शन कुकरवर रात्रीचा शिळा भात उघडाच ठेवलेला होता. त्यावर माश्यांचा नाष्टा होऊन आता दुपारचं जेवणही सुरु होतं. दोन-चार महिन्यापासून न वाचलेल्या पुस्तकांमधून बदामाएवढ्या झुरळांचा लपंडाव सुरु होता.                                                                                                                                                                                                                       खोलीच्या भिंतीवर आडव्या-तिडव्या लाल-काळ्या रंगाचे पट्टे ढेकणांचे अस्तित्व सिध्द करण्यास पुरेसे होते. अशा वातावरणात तो कॉटवर बसून खिडकीतून येणारे ऊन आपल्या पाठीवर घेत बसला होता. 

  ‘Jio Cha Recharge Sampla Ahe
                                     Martes Ka Tewdha Pls?’ 

          त्याने दिपालीला व्हाट्स अपवर मेसेज पाठवला. जसा तोंडात टाकल्यावर रंगतो तो विडा असतो, तसा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्याला एकतरी खडा असतोच! विविध भागांनुसार मग त्याला विविध नावे आहेत जसे की बाड, डब्बा, हत्यार, छावी, आयटम, जीएफ वगैरे वगैरे!
          तिला मेसेज पाठवून तो तिचा डीपी पाहू लागला. नुकताच तिचा साखरपुडा झाला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजू लागला.
          “रोह्या, बाळा बरा हायस का रं?” कॉल उचलताच त्याची आई पलीकडून बोलू लागली.
          “हो. बरा आहे.”
          “पोटाला खातुयास ना रं?”
          भाताच्या उघड्या पातेल्याकडे पाहत तो म्हणाला, “होय. होय. तू काळजी नको करू.”
          “बबल्यासंगं आला असता तर बरं झालं असतं पोरा. लाकडाऊन मधी लै तरास होत असाल बाबा तुला.”
          “त्रास बीस काही नाही.”
          “सरकारनं कुठनं कोट्या मधनं पोरं आणली आणि तुम्हाला पुण्यातनं का सोडत न्हाईत?”
          “अगं अर्ज केलाय मी पण. बघू परवानगी मिळते का.”
          “पैसं संपलं असत्याल न्हवं?”
          “आहेत थोडे.”
          “बरं… पण बाहेर पडू नकूस अजिबात. पोलीस काठ्या घालत्याली आणि हा… बाहेरचं कसलंच खाऊ नकूस. त्येच्याव करोना बसलेला असायचा.”
          “आई अगं, तसं नसतं गं. तो थोडी दिसणार आहे.”
          “तुला नसंल माहित; पण मला मोन्यानं दाखवला हाय मोबाईलवर. ह्यो असा फुटबॉलच्या football चेंडूएवढा  हिरवागार हाय करोना. कुठल्या तरी झाडाच्या कट्ट्यावर, रस्त्याच्या मधोमध वाट बघत असतुया. तोंडाला मास्क आन ते शान…. शान का काय ते…”
          “सॅनिटायजर.”
          ” हा शानटायजर. शानटायजर hand sanitiser. ते हाताला लावलं का लांब पळतंय. तू बी ते लावून जात जा बाबा. सगळ्या अंगाला पायच पाय हायतं बाबा त्येच्या. पार चीनपासनं पळत आलाय म्हनत्याती.”
          “हो आई. बरं… ठेवू का? मला आता अभ्यास करायचाय.” असे म्हणत त्याने फोन ठेवून दिला.
          फोन खाली ठेवताच त्याला रिचार्ज झाल्याचा मेसेज आला व त्याच्यापाठोपाठ दिपालीचा कॉल. बऱ्याच रिंग नंतर त्याने कॉल उचलला आणि काही न बोलताच मोबाईल कानाला लावून बसला. दिपालीही पलीकडून काहीच बोलली नाही. साधारण मिनिटभराच्या शांततेनंतर दिपालीने विचारले, “आला का रिचार्ज?”
          “हो, आला. थँक्स.”
          “बरं, मग ठेवू का?”
          “बाकी काही विचारणार नाहीस का?”
          तिने काही क्षण थांबून विचारले, “कसा आहेस?”
          “मी बरा आहे आणि तू?”
          “मी पण.”
          ते आता प्रत्येक प्रश्नोत्तरानंतर मध्ये थोडा विराम घेऊन बोलत होते.
          “तू का आला नाहीस गावाला?”
          “परीक्षा होती ना एप्रिल मध्ये.”
          “पण ती पुढे गेली ना?”
          “हं…”
          “पैसे आहेत का?”
          “आहेत…… नाहीत.”
          “काय? आहेत की नाहीत?”
          “नाहीत.”
          “खोलीभाडे थकलेच असेल.”
          तो काहीच बोलला नाही. काही वेळ गप्प राहून तो बोलू लागला, “दिपू, आय एम सॉरी यार. याला मीच जबाबदार आहे. सगळं माझ्यामुळे फिस्कटलं. मला माफ कर. प्लिज.”
          “जबाबदार तर तू आहेसच. काय हरकत होती पी.एस.आय ची पोस्ट घ्यायला? पण नाही. तुझा जीव तहसीलदारातच अडकला होता. पी.एस.आय ची पोस्ट घेतली असती तर आता तुझ्यासोबत असते मी.”
          “साखरपुड्याबद्दल अभिनंदन.”
          ती काही क्षण शांत राहून म्हणाली, “सुभाष नाव आहे त्याचं. बरं चल ठेवते फोन आता.”
          “का? सुभाष वेटिंगला आहे का?”
           परत शांतता आणि मग दिपाली म्हणाली, “गळ्यात मंगळसूत्र घालेपर्यंत आलास तरी तुझ्यासोबत येईन. तू येऊन तर बघ.” आणि तिने फोन ठेऊन दिला.
          रोहित खिडकीच्या ग्रीलवर वाळत घातलेल्या त्याच्या भोकं पडलेल्या बनियान मधून आभाळाकडे पाहू लागला. बनियानची ठिगळं जणू आभाळालाच पडल्याचे वाटत होते.
          “आपल्या पण नशिबाला अशीच भोकं पडली आहेत.” असे म्हणून तो रडू लागला आणि काहीतरी वाक्ये बडबडू लागला, “लोकसभा विसर्जन, सदस्यांचे सदस्यत्त्व संपुष्टात, इंदिरा गांधी सरकारविरोधात १९६६ ते ७५ या काळात १२ वेळा अविश्वास प्रस्ताव दाखल, कलम १२० मध्ये इंग्रजी भाषेचा वापर १५ वर्षांसाठी, UPI-PIN हा पासवर्ड what is upi pin आहे, जो कुणालाच द्यायचा नसतो, मागील वर्षी african country आफ्रिकी देशातील ७२ दशलक्ष लोक उपासमारीने पीडित होते, S.A Node मुळे हृदयाची लयबद्धता सांभाळली जाते, म्हणून त्याला पेसमेकर what is pacemaker म्हटले जाते…….. “
          इतक्यात त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो,

  ‘Dear Customer, Your a/c no
                              XXXXXXXXXX0143 is credited by Rs.
                             15000 on 4-May-2020 03:13:00 ‘

5 thoughts on “पेसमेकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *