• Pune, Maharashtra
कथा
पाऊले चालती ..!

पाऊले चालती ..!

       

 

 

  “आवं, बास की.”

          “संगे,अजून थोडा वेळ. मग झालं.”

          “आता माझ्याच्यानं न्हाय हुनार. लई तरास व्हायला लागलाय.”

          “अगं एका पोराची आय हाय तू. असं काय नव्या नावरीगत करत्याय. थोडी कळ काढ की, मग थांबू.”

          संगीच्या पायातून भळाभळा रक्त वाहत होते. तरीही डोक्यावर कपड्यांचे बोचके घेऊन ती अनवाणी पायाने गण्याच्या मागे माळरान तुडवीतच निघाली होती. गण्याही आपल्या तीन वर्षाच्या पोराला खांद्यावर घेऊन रात्रीच्या अंधारात त्या सुनसान माळरानात वाट शोधत पुढे निघाला होता. त्याच्याही पायांना खुरट्या काटेरी झुडपांनी ओरबाडून अगदी रक्तबंबाळ केले होते!

         हिवाळा संपताच तो आणि संगी आपल्या लहान पोराला घेऊन ऊसतोडीसाठी महुदवरुन कोल्हापूरला आले होते. विठ्ठलाच्या कृपेने आल्याआल्या चांगले उसाचे फड त्याला तोडणीसाठी मिळाले होते. महिनाभरात त्याने आणि संगीने बरेच उसाचे फड गाजवले होते.!

          पण २२ मार्चला जेव्हा पंतप्रधानांनी रात्री कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन lockdown in india जाहीर केले pm modi declared nationwide lockdown आणि यांचे दिवसच पालटले. जेवताना तोंडात घातलेला घास तसाच ठेवून गण्या आपल्या कोयत्याकडे पाहत राहिला. आता २१ दिवस त्याला तो हात लावणार नव्हता. 20 days of strict lockdown.

          “तरी मी सांगत हुते. सगळी लोकं गावाला निघाल्यात तर आपण बी जाऊया; पण आमचं कोण ऐकतंय?”

          “संगे, गरिबाला नसतं तसलं लॉकडाऊन बिकडाऊन. ते इमानातनं फिरणाऱ्यांसाठी असतं तसलं. आपण पडलू कामगार लोकं. दोन दिस वाट बघू आणि सरकू महूदाला कडंकडंनं.”

          “आत्याबाय काळजीत पडल्या असत्याल तिकडं. आपलं काय न्हाय पण लेकरावर लई जीव हाय त्येंचा.”

          “चारपाच दिस जरा कडक धरत्याली. आपण एक तारखेच्या आसपास निघू की.”

           काळोखात गाण्याला एक झाड दिसले तसा तो पाय ओढतच तिकडे गेला. खांद्यावरचं लेकरू केव्हाचं झोपलं होतं. त्याला हळूच खाली घेत त्याने आपली पाठ त्या झाडाच्या बुंद्याला अलगद टेकवली आणि तो शांत होत श्वास घेऊ लागला. संगीने येऊन डोक्यावरचे बोचके खाली आपटले आणि त्याचा आधार घेत तीही तिथे आडवी झाली. गावोगावी असलेला पोलिसांचा पहारा चुकवून रानावनांतून वाट काढत त्याचा प्रवास आता या झाडाखाली विसावला होता. 

          गण्याने खिशातील दोन दिवसापूर्वी स्वीचऑफ झालेला मोबाईल बाहेर काढला आणि काहीशा आशेने तो सुरु करू लागला how to switch on the mobile phone; पण तो सुरु होत नसल्याने त्याने परत तो खिशात ठेऊन दिला आणि शेजारी पडलेल्या संगीकडे एकटक पाहू लागला. 

          संगी आकाशातील तारे अगदी डोळे भरून न्याहाळत होती. तिचे अंग घामाने ओलेचिंब झाले होते, तरीही ती पदराने वारे घेत होती. तिच्या पायांना झालेल्या जखमांतून अजूनही रक्त येत होतं. 

          “काय वं, आपुन भिकारी हाय का?”

          “नाय बी.”

          “मग तासगावातल्या आश्रमशाळंत कुणी बी जेवण देयला आला का शेल्फ्या आणि फूटू का काढत हुता?” 

          “जगाची रीतच हाय तशी. करायचं एवढं आणि कालवा मातूर गावभर करायचा.”

          “नायतर काय. प्रत्येकाची नड असती. आज आपली, उद्या कुना दुसऱ्याची. इट्ठला बगतुयास का रं बाबा?” संगी आभाळाकडे पाहत म्हणाली. गण्याही आता आकाशाकड़े पाहू लागला. 

          “तुमी तर म्हणाला हुता इमानातल्या लोकांसाठी लॉकडाऊन mumbai lockdown news, lockdown news in mumbai असतं आणि ती करुना का बिरुना आपल्याला काय करत नसतु. आवं इमानातनं येणारा घरात की वं बसलाय आन करुना झाल्यावर काय हुतं आपल्याला काय बी म्हाईत न्हाय पण आपली ही अवस्था काय करुनापेक्षा कमी झालीया का?” संगीला आता रडू कोसळलं होतं. शांत माळरानावर तिचं रडणं मन हेलावणारं होतं. इकडे गण्याच्याही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या.!

          “हातावर पोट असणाऱ्यांचीच फरफट झालीया नुसती. तुमाला थोडं जास्तीचं शिकायला येत नव्हतं का वं?”

           त्यांचे बोलणे सुरु असताना अचानक त्यांचे लहान लेकरू जागे झाले. 

          “बाबा, घल आलं का?” डोळे चोळत त्याने विचारले. 

          “नाय रं आलं अजून बाळा.” असे म्हणत संगीने गण्याच्या शेजारी कपड्याचे बोचके सरकवले व त्याच्या खांद्याला डोके टेकवत म्हणाली, “झोप शोन्या, जवळ आलंय घल आपलं.”    

          “मला गोष्ट ऐकायची हाय.”

          “आवं गोष्ट सांगत झोपवा ह्याला. माझं डोळं झाकाया लागल्यात.”

          गण्या काही क्षण शांत राहिला. 

          “बाबा, सांग की गोष्ट.”

          “एक असतो राजा. तो लई गरीब असतो. त्याला एक राणी असते. दोघांनाही एक लहान राजकुमार असतो ……… ” असे म्हणत गाण्याची गोष्ट सुरु झाली. गोष्ट सांगताना मागील महिन्याचा सगळा घटनाक्रम त्याच्या डोळ्यांसमोरून जात होता. विझलेली चूल, मोकळी भांडी, भुकेलेले तान्हे मुल, रखरखतं ऊन, तळपता डांबरी रास्ता, पोलिसांचा बंदोबस्त, त्यांच्या शिट्ट्या-काठ्या, तहान, घाम, पाणावलेले डोळे, भूक, भीक, काढलेला पळ, काट्याकुट्याने रक्ताळलेले पाय! सगळं काही त्याच्या डोळ्यांतील अश्रूंसोबत ओघळत राहिलं. 

          “पोरा, लेका शिकाया लागतंय बघ advantages of education. शिकाया लागतंय.!” असे म्हणून त्याने डोळे पुसत त्याची गोष्ट संपवली. त्याचं तान्हं लेकरू केव्हाचं झोपी गेलं होतं. संगीसुद्धा!

          त्यांच्याकडे पाहत गण्यालाही कधी झोप लागली कळलेच नाही. मे महिन्याच्या पहिल्या सकाळच्या कोवळ्या उन्हाने त्याला जागे केले. मग संगीही जागी झाली. पाखरांचा किलबिलाट कानी येत होता. झोपलेले लेकरू पुन्हा खांद्यावर घेऊन व बोचके डोक्यावर घेऊन ते ऊसतोड कामगार वाळलेल्या रक्ताच्या पायांनी आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले!

                     महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा !