शिवसुताय...लिहित जाय...!
तू थेंब इवलासा...! अर्थ जीवनाचा,अर्थ मरणाचा तू थेंब इवलासा ! परि तूजलाच न कळे तू हाय किती मोलाचा ! रखरखतं ऊन,भेगाळलेलं रान बाप माझा बसतो दिसभर पोटाला न्हाय आन मनात तुझीच तहान कुडाचं खोपटं,आत तान्हुलं रोपटं आकांत करतं घोटभर दुधापाय पर पाठीला पोट चिकटलेली काय करंल माय ? रान तापलं,पीक करपलं पोरासारखी जपलेली मुकी जनावरं दिसतायत नुसती हाडं मांस कधीच हरपलं ! चुलीवर तवा,शेजारी दिवा कोंडा बी खाऊन संपल्यावर डोळ्यांतलं पाणी गालावर ओघळलं खारट असून बी मी पिऊन टाकलं ! - शिवसुत.
[…] अन् मनोमन ती रडायची […]
[…] होते आणि त्यांतून ठिपकणारे पाण्याचे थेंब खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हामुळे […]
[…] तुझ्या तोराचिंब देहावरूनी तुझ्याया पाऊस […]
[…] रखरखत्या वाळवंटी […]
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name
Email
Website
[…] अन् मनोमन ती रडायची […]
[…] होते आणि त्यांतून ठिपकणारे पाण्याचे थेंब खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या उन्हामुळे […]
[…] तुझ्या तोराचिंब देहावरूनी तुझ्याया पाऊस […]
[…] रखरखत्या वाळवंटी […]