मराठी कविता
सुंदर रूप तुझे जसे
उन्हात चमके पितळ
थांग कसा लावू मनाचा
मन चंचल,चतुर,चपळ!
डोळे मृगनयनी अन
कांती तुझी नितळ
रखरखत्या वाळवंटी तू
वाटे मज एक मृगजळ
हास्य जणू तुझे असे
की मधू सुंदर,निखळ
वाहतो कलेने जसा
अमृताचा झरा खळखळ
भिजल्या साडीत जणू
तू एक टवटवीत कर्दळ
पावसाच्या रिमझिम सरींत
तुझ्या आठवणींची वर्दळ..!
– शिवसुत
[…] तू काय वादळ आहे?’ मग पुन्हा एकदा एक वादळ येऊन मला धडकले आणि म्हणाले, ‘आता […]
Bharich 👍👍