• Pune, Maharashtra
कविता
ऊठ शिवबा

ऊठ शिवबा

uth shivbaऊठ शिवबा

ऊठ शिवबाशिवबा, ऊठ शिवबा
 कृष्णामाई बघ भेटी आली.”
 माणगंगा माय माझी
 आज मजला हाक देई.
 “उठू कसा माये?
 तुझ्याच कुशीत आता पहुडलो आहे,
 चिरकाल निद्रा घेतो आहे,
 ऊन वारा सोसतो आहे
 पावसाचे थेंब झेलतो आहे.
 धन्य होती ती माय विठाई
 जिच्या उदरी जन्मासी आलो
 अन राख होउनी आज
 तुझ्या कुशीत बागडलो.
 जरी जाहलो राख आज
 तरी राखेतूनही या
 मी उठणार आहे
 माणगंगेच्या पाठीवरुनी
 कृष्णामाई संगे मी
 सागरास त्या मिळणार आहे
 मग बाष्प होऊनी
 उंचच उंच जाणार आहे
 अन परत नव्याने बनूनी मेघ
 या इथेच मी बरसणार आहे.
 मृत्यू जरी असे अंतिम सत्य
 त्याच्याही पुढे मी आलो आहे.
 विचारांच्या कित्येक मशाली 
 धगधगत्या मी ठेवूनी आलो आहे!” 
              -शिवसुत